Pune PMC News | रोबोटिक यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार पाण्याच्या लाईन चे दुरुस्ती काम | पावणेतीन कोटी येणार खर्च 

Homeadministrative

Pune PMC News | रोबोटिक यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार पाण्याच्या लाईन चे दुरुस्ती काम | पावणेतीन कोटी येणार खर्च 

Ganesh Kumar Mule Jan 06, 2026 4:42 PM

 PMC Road Departmetn | प्रकल्पांची नावे बदलून त्याच रस्त्यांची वारंवार दुरुस्ती कशासाठी? |  रस्त्याच्या कामाबद्दलची श्वेतपत्रिका काढण्याची माजी नगरसेवकांची पथ विभाग प्रमुखांकडे मागणी
SI, DSI Transfer | वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक या पदावरील सेवकांच्या समुपदेशाने होणार बदल्या 
Nitin Gadkari | दोन्ही पालखी मार्गांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पाहणी

Pune PMC News | रोबोटिक यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार पाण्याच्या लाईन चे दुरुस्ती काम | पावणेतीन कोटी येणार खर्च

| ७२ ब नुसार निधी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – पाणी पुरवठा करणा-या अनेक लाईन्स जुन्या व जिर्ण झालेल्या आहेत. जुन्या पाईप मधून पाणीगळती, दुषित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा इ. समस्या वारंवार उद्भवत आहेत. या तक्रारींचे निवारण लवकर होत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन दुरुस्ती साठी रोबोटिक यंत्रणा वापरणार आहे. त्यासाठी ३ वर्षासाठी २ कोटी ७२ लाख इतका खर्च येणार आहे. हा निधी ७२ ब नुसार उपलब्ध करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

स्थायी समितीच्या प्रस्तावा नुसार  पुणे शहराचा वाढता विकास व त्या अनुषंगे वाढती लोकसंख्या यांचा विचार करता पाणी पुरवठा करणेसाठी धरणाचा मुख्य स्त्रोत ते ग्राहक (नागरिक) यांना पाणीपुरवठा करणेसाठी खूप मोठी यंत्रणा अस्तित्वात आहे. यामध्ये १०० मी. मी. व्यासाच्या पाईप लाईन पासून ते ३०३० मी. मी. व्यासाच्या पाईप लाईन पर्यंतचा समावेश आहे. तसेच पाईप लाईन देखील अनेक प्रकारात म्हणजेच MS, CI/भद्रावती, DI, GI, Prestressed, PVC, UPVC अशा वेगवेगळ्या Material च्या आहेत.

सद्यस्थितीत पुणे शहराचा वाढता विकास व त्या अनुषंगे वाढती लोकसंख्या यांचा विचार करता पाणी पुरवठा करणा-या अनेक लाईन्स जुन्या व जिर्ण झालेल्या आहेत. सर्व पाण्याच्या लाईन भूमिगत असून यापैकी माहित असलेल्या पाण्याच्या लाईन समान पाणी वाटप योजने अंतर्गत बदलण्यात आल्या आहेत. जुन्या पाईप मधून पाणीगळती, दुषित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा इ. समस्या वारंवार उद्भवत आहेत. पाणीपुरवठा विभागाकडे अशा स्वरूपाच्या दरमहा ३०० ते ३५० तक्रारी प्राप्त होत असतात. प्रचलित पद्धतीनुसार सदरील तक्रारांचे निराकरण करण्यास ८ दिवस ते १ महिना इतका कालवधी लागत असून वारंवार कराव्या लागणाऱ्या खोदाई मुळे नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. तसेच आर्थिक खर्च देखील वाढतो. असे प्रस्तावात म्हटले आहे.

Robotic यंत्रणेच्या आधारे काम केल्यास वारंवार होणारी रस्ते खोदाई, या खोदाईच्या अनुषंगे इतर संसाधनांची बचत, वेळेची बचत, आर्थिक बचत, नागरिकांना होणारा त्रास अशा अनेक बाबी टाळता येणार आहेत. अशा प्रकारची यंत्रणा पुरविणारी भारतामध्ये दोन कंपन्या असून यामध्ये त्यांचे स्पेसिफिकेशन नुसार दोन ते तीन रोबोटिक कॅमेरे पुरविणे, वाहन पुरविणे व तीन वर्षांसाठी चालविणे तसेच देखभाल दुरुस्ती करणे या कामा करिता एकूण २ कोटी ७२ लाख इतका खर्च ३ वर्षासाठी येणार आहे. हा निधी ७२ ब नुसार उपलब्ध करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: