Pune PMC News | विमानतळ आणि आसपासच्या परिसरात विमानतळ प्राधिकरण व पुणे महानगरपालिका यांची एकत्रित पाहणी
Pune Airport Authority – (The Karbhari News Service) – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सोबत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरण व पुणे महानगरपालिका यांची विविध विषयांवर एकत्र पाहणी 19 जुलै रोजी करण्यात आली. त्याचबरोबर हडपसर कचरा ramp या ठिकाणी महापालिका आयुक्त यांनी भेट दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
यावेळी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त, एम जे पी चंद्रन विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभाग मुख्य अभियंता अनिरुद्ध पावस्कर , घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त संदीप कदम , उपायुक्त माधव जगताप, प्रशांत ठोंबरे , विमानतळ प्राधिकरणाचे संतोष ढोके उपस्थित होते.
विमानतळ प्राधिकरणाने दिलेले सर्व कचऱ्याचे ठिकाने स्वच्छ झाली आहेत. याबाबत पाहणी करताना सर्व कामे समाधानकारक रित्या पूर्ण झालेल्या असून त्याबाबत महापालिका आयुक्त यांनी तसेच विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर लगतच्या परिसरामध्ये खाजगी मोकळ्या जागा यावर असणारे कचरा व राडाराडा काढण्याच्या अनुषंगाने संबंधितांना सात दिवसाची नोटीस देऊन त्या जागा स्वच्छ करून घेण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र महापालिका अधिनियम तरतुदीनुसार त्या जागा महापालिका अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण केल्या बाबत ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करेल. त्याचबरोबर त्या जागेवरील कचरा व राडाराडा महापालिकेमार्फत साफ करून त्यासाठी येणारा खर्च दंडासह वसूल करून अथवा त्यांचे मिळकत करा मध्ये त्याची वसुली करणेबाबत महापालिका कार्यवाही करेल. त्याचबरोबर विमानतळ परिसर व त्यांचे मालकीचे रस्ते याची देखभाल दुरुस्ती व त्या ठिकाणी कचरा पडणार नाही. याची संपूर्ण व्यवस्था ही विमानतळ प्राधिकरण व एअरफोर्स ऍथॉरिटी यांनी करावयाची आहे. महापालिका त्यांना आवश्यकतेनुसार मदत दिली जाईल.

वाघोली येथील भाजी मंडई त्याचबरोबर परिसरातील स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून तो परिसर तातडीने स्वच्छ करून नागरिकांकडून रस्त्यावर कचरा टाकले जाणार नाही याबाबत प्रबोधन केले जाईल. त्याचबरोबर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे. स्वच्छ संस्थेमार्फत बऱ्याच ठिकाणी कचरा नागरिकांनी पैसे न दिल्यामुळे स्वीकारला जात नाही. परंतु नियमानुसार त्यांनी कोणाचाही कचरा नाकारायचा नाही. त्याचबरोबर जर त्यांच्याकडून संकलन होत असताना जर त्या भागामध्ये कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट आढळून आल्यास त्या भागातील त्यांना दिलेले काम काढून घेण्यात येईल व महापालिकेमार्फत त्या ठिकाणी दुसरी यंत्रणा कचरा संकलनासाठी नियुक्त केली जाईल . शहरातील कचरा हस्तांतरण केंद्रे यामध्ये हडपसर रॅम्प व इतर रॅम्प याचे बंदिस्त शेड करून mechanised ट्रान्स्फर स्टेशन करणेबाबत निर्णय घेण्यात आला त्यानुसार तातडीने कारवाई करणे बाबत तसेच पुणे कँटोन्मेंट बोर्ड यांचा 10 ते 12 एकरावरील जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याची नियोजन करावे. अशा नवल किशोर राम महापालिका आयुक्त यांनी सूचना दिलेल्या आहेत. सोमवारी 5 वाजता PMC व PCB यांचे संबंधित अधिकारी यांची मीटिंग पुणे मनपा येथे आयोजित करण्याचे आयुक्त यांनी आदेश दिले आहेत. तसेच मुंढवा पुलाजवळील नदी किनारी असलेले अनधिकृत हॉर्डिंग तातडीने काढण्याचे आदेश आयुक्त यांनी दिले आहेत.

COMMENTS