Pune PMC News | खाऊ पासून मुले वंचित राहणर नाहीत  | उपायुक्त किशोरी शिंदे यांची माहिती 

Homeadministrative

Pune PMC News | खाऊ पासून मुले वंचित राहणर नाहीत  | उपायुक्त किशोरी शिंदे यांची माहिती 

Ganesh Kumar Mule Aug 15, 2025 8:43 AM

PMC Central Store Department | स्वातंत्र्यदिनाला शाळकरी मुले खाऊपासून राहणार वंचित! | टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका!
79th Independence Day in PMC | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ संपन्न
RSS | लाल किल्ल्यावरून आरएसएसचे कौतुक करण्याची आवश्यकता काय ?  भारतीय जनता पार्टीने उत्तर द्यावे  | कॉंग्रेस ची मागणी 

Pune PMC News | खाऊ पासून मुले वंचित राहणर नाहीत  | उपायुक्त किशोरी शिंदे यांची माहिती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका प्राथमिक शाळेतील १ ली ते आठवीच्या मुलांना स्वातंत्र्य दिन समारंभाला खाऊ स्वरुपात बिस्किटे दिली जातात. मात्र यंदा  बिस्किट खरेदीची टेंडर प्रक्रिया अजून पूर्ण वेळेत पूर्ण न झाल्याने खाऊ वेळेत मिळणार कि नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र मुले खाऊ पासून वंचित राहणार नाहीत, अशी माहिती उपायुक्त किशोरी शिंदे यांनी दिली आहे. सर्व शाळांना खाऊ चे वाटप झाले आहे, असे देखील उपायुक्त शिंदे यांनी सांगितले.  (PMC Independence Day)

१५ ऑगस्ट तथा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी परंपरेप्रमाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील मुलांना खाऊ वाटप केले जाते. बिस्किटांची खरेदी मध्यवर्ती भांडार विभागाकडून केली जाते. शाळेय विभागाकडून यांची मागणी केली जाते. त्यानुसार प्रक्रिया केली जाते. दरवर्षी ७ दिवस अगोदर ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊन माल आणला जातो. मात्र यंदा या प्रक्रियेला उशीर झाला होता. त्यामुळे खाऊ वाटपावर प्रश्न उपस्थित झाला होता. (PMC Central Store Department)

शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते कि, जून महिन्यात याची मागणी करण्यात आली होती. मात्र भांडार विभागाच्या उपायुक्त शिंदे यांनी सांगितले कि, मुळात मागणी आमच्याकडे उशिरा आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेत वेळ गेला. मात्र असे असले तरी आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व शाळाना खाऊ देण्यात आला आहे. मुलांना खाऊ हा आजच मिळणार आहे. तशी काळजी आम्ही घेतली आहे. असे शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: