Pune PMC News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या बँकेने केली बिल लेखनिकाची तक्रार! | जाणून घ्या काय आहे प्रकार!
Pune Municipal Corporation- (The Karbhari News Service) – पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंटस को -ऑप बँक लि. पुणे, ही महापालिका सेवकांची बँक आहे. या बँकेकडून आलेल्या तक्त्यानुसार बिल लेखनिक संबंधित कर्जदार सेवकाच्या वेतनातून कपात करीत नसल्याचे बँकने महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. (Pune Municipal Corporation Servants Co operative bank Ltd Pune)
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ४९ अन्वये सहकारी बँकेच्या कर्जाचे हमे कर्जदार सेवकाच्या पगारातून बँकेने पाठविलेल्या मागणीनुसार वेळेवर कपात करणे बंधनकारक आहे. हप्ता वेळेवर न भरल्याने कर्मचाऱ्यांना नाहक व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
याची कामगार कल्याण विभागाकडून गंभीरपणे दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी सर्व खातेप्रमुख आणि बिल लेखनिक यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व पगारपत्रक लेखनिक व आहरण व संवितरण अधिकारी यांनी पुणे म्यु. सह को. ऑप. बँकेकडून कर्ज वसुलीबाबत आलेल्या तक्त्यानुसार संबंधित कर्जदार सेवकाच्या पगारातून कर्ज हप्ता वेळेवर कपात करण्याची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे संबंधित खातेप्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखलील पगारपत्रक लेखनिक व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. असेही आदेशात म्हटले आहे.
COMMENTS