Pune PMC News | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून अस्तित्वातील व नियोजीत रस्त्यांची जागा पाहणी
Omprakash Divate PMC – (The Karbhari News Service) – बुधवार रोजी सकाळी अतिरिक्त महापालिका महापालिका आयुक्त (विशेष) यांनी मुंढवा ताडीगुत्ता चौक ते हडपसर रेल्वे स्टेशन तसेच हडपसर रेल्वे स्टेशनच्या उत्तर व दक्षिण बाजूकडील अस्तित्वातील व नियोजीत रस्त्यांची जागा पाहणी केली. (Pune Municipal Corporation – PMC)
रस्तारूंदी क्षेत्रातील मिळकतधारकांची बांधकामे तसेच रस्त्याच्या आखणी बाधित क्षेत्रामध्ये रेल्वे टर्मीनलची चालू असलेली बांधकामे यांची पाहणी केली तसेच रस्तारूंदी बाधित क्षेत्राचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने भू संपादन करणे व रस्तारूंदीत अडथळा ठरणारी बांधकामे नोटीसा देवून व संयुक्तिक कारवाईचे नियोजन करून काढण्याचे आदेश दिले
हडपसर रेल्वे स्टेशनच्या दक्षिण बाजूकडील पी.पी.पी. अंतर्गत चालू असलेल्या कामांची पाहणी करून कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
पाहणीचे वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता ( पथ ) अनिरूध्द पावसकर , अप्पर रेल प्रबंधक पद्मसिंह जाधव , रेल्वेचे CPM / GSV संजय लव्हात्रे उपस्थित होते.
COMMENTS