NAAC Committee | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास उद्या नॅक कमिटीची भेट

HomeपुणेBreaking News

NAAC Committee | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास उद्या नॅक कमिटीची भेट

कारभारी वृत्तसेवा Nov 28, 2023 8:26 AM

National Sports Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा
Annasaheb Waghire college Teacher | डॉ. उमेशराज पनेरु यांना उत्कृष्ट क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक पुरस्कार
Annasaheb Waghire College | वाघिरे महाविद्यालयात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा

NAAC Committee | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयासउद्या नॅक कमिटीची भेट

NAAC Committee | २९  व ३० नोव्हेंबर नॅक कमिटी (बेंगलोर कार्यालय) अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास (Annasaheb Waghire College) भेट देणार आहे. ही माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे व  उपप्राचार्य,नॅक/आय. आय.क्यू.सी. समन्वयक डॉ.व्ही.एम. शिंदे यांनी दिली.
या भेटी दरम्यान ही समिती महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन त्या ठिकाणाची माहिती घेणार आहे. प्राध्यापकांचे संशोधन कार्य, महाविद्यालयाने विविध संस्थांबरोबर केलेले सामंजस्य करार, प्राध्यापकांना व महाविद्यालयास मिळालेले विविध पुरस्कार,विविध समाज उपयोगी उपक्रम, ग्रंथालयाची प्रगती, राष्ट्रीय सेवा योजना, एन सी.सी, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, सांस्कृतिक कार्यक्रम, सौर ऊर्जा, गांडूळ खत प्रकल्प, रेन हार्वेस्टिंग, महाविद्यालयातील औषध उपयोगी झाडे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी असलेली वसतीगृहाची सोय, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी  व पालकांबरोबर ही समिती सुसंवाद साधणार आहे. दरम्यान सदर समिती  महाविद्यालयातील विविध भौतिक सोयी-सुविधांची पाहणी करणार आहेत.