Pune PMC News | पर्यावरण संवर्धन अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार गणेश सोनुने यांच्याकडे | समाज विकास विभागाचा पदभार आशा राऊत यांच्याकडे
PMC Officers – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील पर्यावरण संवर्धन अधिकारी हे पद सद्यस्थितीत रिक्त आहे. त्यामुळे या विभागात तांत्रिक कामात अडचणी येत आहेत. यामुळे प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी या पदाचा अतिरिक्त पदभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
तसेच उपायुक्त जयंत भोसेकर हे वयोपरत्वे ३१ डिसेंबर ला सेवानिवृत्त होत आहेत. भोसेकर यांच्या कडे समाज विकास विभाग, मागासवर्ग विभाग आणि तक्रार निवारण अधिकारी पदाचे कामकाज आहे. तसेच ते पदोन्नती समितीत सदस्य देखील होते. हे पदभार इतर अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार समाज विकास विभाग, मागासवर्ग विभाग आणि तक्रार निवारण अधिकारी पदाचे पदभार उपायुक्त आशा राऊत यांना देण्यात आले आहेत. तर पदोन्नती समितीत उपायुक्त अविनाश सकपाळ यांना नियुक्ती देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

COMMENTS