Pune PMC News | बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल | पुणे महापालिकेची कारवाई 

HomeBreaking Newsपुणे

Pune PMC News | बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल | पुणे महापालिकेची कारवाई 

गणेश मुळे May 25, 2024 2:09 PM

NCP Youth | छत्रपतीं संदर्भातील वक्तव्यावरून युवक राष्ट्रवादीची कोथरूड मध्ये राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी
Online System | शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना आता ऑनलाईन | नागरिकांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही 
Ravindra Dhangekar | हा विजय रविंद्र धंगेकरांचा! महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये

Pune PMC News | बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल | पुणे महापालिकेची कारवाई

 

Pune Municiapal Corporation Latest News – (The Karbhari News Service) – बाणेर येथे आज रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली. तसेच बाणेर मधील एकूण 9 रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Building Devlopment Department)

कारवाई मधे सुमारे 11925 चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.
हॉटेल इमेज रेस्टोबार , आइस अँड फायर बाणेर हायवे लगत आणि हॉटेल हाईव्ह रांका ज्वेलर्सच्यावर हि कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता – श्रीधर येवलेकर , बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता  जयवंत पवार  यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता  प्रकाश पवार, कनिष्ठ अभियंता – अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव व स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.