Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन | प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ न दवडण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

HomeपुणेBreaking News

Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन | प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ न दवडण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

Ganesh Kumar Mule May 13, 2023 1:38 AM

Rajiv Nandkar Book | स्वतःला ओळखा; सुख आपल्यातच दडलेले आहे – अविनाश धर्माधिकारी
PMC Deputy Commissioner | आशा राऊत, तुषार बाबर, संतोष टेंगले यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती | तर काही कार्यरत उपायुक्त यांची पुन्हा पुणे मनपात पदस्थापना
PMC Deputy Commissioner | इब्राहिम चौधरी यांची पुणे महापालिकेत प्रति नियुक्तीने उपायुक्त पदी नियुक्ती! | निवडणूक आयोगाच्या आदेशाने कुणाची बदली होणार?

Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन | प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ न दवडण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

| आयुक्तांनी मंजूरी दिल्यांनतरही प्रस्ताव पुढे जाईना 

PMC Pune Education Department | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर  मंडळ हा एक महापालिकेचा (PMC Pune) विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती (promotion) पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान महापालिका सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. मात्र यात कालावधी वाया जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकासेवा (PMC pune new) प्रवेश नियमावली २०१४ नुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे शिडी प्रमाणे त्यांना संधी मिळणार आहे. आज मितीस माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील ळांतील शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या/बढत्या या पुणे महानगरपालिका आस्थापनेवर करण्यात येत नाही. तसेच त्या शिक्षकेतर सेवकांची सेवाज्येष्ठता ही स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. पुणे मनपाकडील अन्य विभाग जसे मुख्यलेखापरीक्षण विभाग, नगरसचिव कार्यालय, मुद्रणालय विभाग या कार्यालयाकडील सर्व संवर्गाच्या सेवकांच्या देखील सेवाजेष्ठता याद्या व रोस्टर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादी एकत्रित केल्यास पुणे महानगरपालिकेच्या मुळ संवर्गातील सेवकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन त्यास मूळ संवर्गातील सेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसेच सदर शिक्षकेतर सेवकांच्या सेवाजेष्ठता पुणे महानगरपालिका आस्थापनेत विलिन करावयाच्या झाल्यास मनपा आस्थापनेवरील मंजूर पद संख्येत बदल करावे लागतील . मनपा आस्थापनेवरील मंजूर पदांवर प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई, रखवालदार पदावरील रोजंदारी कर्मचारी सामावून घेण्याची मागणी देखील करण्याची शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने समायोजनाचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली आहे. (Pune Municipal Corporation News)
आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्याने आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत.  त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून  प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून बदल्या केल्या जातील. मात्र आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतरही ही प्रक्रिया करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कर्मचारी पदोन्नती बाबतच्या काही तांत्रिक बाबी आणि कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्यामुळे प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ लागणार आहे. मात्र हे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जाईल.
– सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.
—-
Pune PMC Education Department |  Education Department Adjustment |  Demand of employees not to waste time in releasing the draft list