Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत बाधा! 

HomeBreaking Newsपुणे

Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत बाधा! 

Ganesh Kumar Mule Sep 30, 2023 11:13 AM

Voter Awareness | निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती
Mahavikas Aghadi | भाजपामधील आयारामांना इंडिया आघाडीने उमेदवारी देऊ नये | सामाजिक कार्यकर्त्याचा इशारा
Contract Employees | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मेळावा | 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे मानले आभार

Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत बाधा!

| लवकरात लवकर समायोजन करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

PMC Pune Education Department | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर  मंडळ हा एक महापालिकेचा (PMC Pune) विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती (promotion) पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान महापालिका सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. मात्र अजूनही समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून सेवाज्येष्ठता ठरवून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान या प्रक्रियेस अजून वेळ लागणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकासेवा (PMC pune new) प्रवेश नियमावली २०१४ नुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे शिडी प्रमाणे त्यांना संधी मिळणार आहे. आज मितीस माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील ळांतील शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या/बढत्या या पुणे महानगरपालिका आस्थापनेवर करण्यात येत नाही. तसेच त्या शिक्षकेतर सेवकांची सेवाज्येष्ठता ही स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. पुणे मनपाकडील अन्य विभाग जसे मुख्यलेखापरीक्षण विभाग, नगरसचिव कार्यालय, मुद्रणालय विभाग या कार्यालयाकडील सर्व संवर्गाच्या सेवकांच्या देखील सेवाजेष्ठता याद्या व रोस्टर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादी एकत्रित केल्यास पुणे महानगरपालिकेच्या मुळ संवर्गातील सेवकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन त्यास मूळ संवर्गातील सेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसेच सदर शिक्षकेतर सेवकांच्या सेवाजेष्ठता पुणे महानगरपालिका आस्थापनेत विलिन करावयाच्या झाल्यास मनपा आस्थापनेवरील मंजूर पद संख्येत बदल करावे लागतील . मनपा आस्थापनेवरील मंजूर पदांवर प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई, रखवालदार पदावरील रोजंदारी कर्मचारी सामावून घेण्याची मागणी देखील करण्याची शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने समायोजनाचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजूरी दिली आहे.
आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्याने आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत.  त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून  प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून बदल्या केल्या जातील. मात्र आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतरही ही प्रक्रिया करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.