Pune News | तूर्तास तरी पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका नाहीच!

Homeadministrative

Pune News | तूर्तास तरी पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका नाहीच!

Ganesh Kumar Mule Jul 03, 2025 7:18 PM

Kojagiri Purnima 2025 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार! | सह महापलिका आयुक्त डॉ अशोक घोरपडे यांची माहिती
PMC Election | महापालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण आणि आरक्षण सोडत बाबतचे वेळापत्रक जाहीर
MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न | दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान

Pune News | तूर्तास तरी पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका नाहीच!

MLA Yogesh Tilekar – (The Karbhari News Service) – तूर्तास तरी पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका नाहीच, हे आता स्पष्ट झाले आहे.  परंतु, नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांना लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकार कडून दिले. अशी माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी दिली. (Pune New Corporation)

पुणे महानगरपालिकेवरील वाढता ताण आणि पूर्व पुण्यातील उपनगरांच्या समस्या सोडवण्यासाठी, आमदार योगेश टिळेकर यांनी आज हडपसर-मांजरी-वाघोलीसाठी स्वतंत्र महानगरपालिकेच्या निर्मितीची मागणी केली. या भागाची लोकसंख्या आणि आर्थिक क्षमता पाहता, हा निर्णय न्यायसंगत आणि आवश्यक आहे. यावर सरकारने तातडीने विचार करावा अशी मागणी केली. परंतु, सध्या नव्या महानगरपालिकेचा कोणताही प्रस्तावित निर्णय नसल्याने नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांना लागेल तेवढा निधी देण्याचा आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: