Pune News | पुण्यात बदलापूरची पुनरावृत्ती, चिमुकल्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आक्रमक भूमिका
NCP – SCP – (The Karbhari News Service) – बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतरही सरकारने विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कोणतीही धोरणात्मक भूमिका स्पष्ट न केल्याने अत्याचारांची ही मालिका अजूनही सुरूच आहे. आज पुणे शहरातील कोंढवा येथील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर स्कूल बसच्या ड्रायव्हरनेच लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने या दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त करत नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अशी घटना उघडकीस येणे ही अत्यंत शरमेची बाब आहे अशी भूमिका मांडली.
पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पतंगे तसेच, विभागाचे पोलीस उपायुक्त श्री. राजा यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींवर जास्तीत जास्त कलमे लावण्यात यावीत तसेच हे दुष्कृत्त करणाऱ्या नराधमांना फाशी व्हावी अशी मागणी केली.
तसेच, बदलापूर प्रकरणात ज्याप्रमाणे काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेकडून झाला तसा प्रकार पुण्यातील घटनेबाबत करू नये अशी विनंती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.
COMMENTS