NCP’s agitation : शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन 

HomeBreaking Newsपुणे

NCP’s agitation : शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन 

Ganesh Kumar Mule Apr 08, 2022 2:30 PM

MLA Sunil Tingre | सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार ? | सुनील टिंगरे यांचा सवाल | विधानसभेत आमदारांनी प्रश्‍नाला वाचा फोडली.
Property Tax | पुणेकरांना शिंदे फडणवीस सरकारचा दिलासा | ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार | येत्या कॅबिनेट मीटींग मध्ये प्रस्ताव आणून मान्यता देणार
MLA Sunil Tingre | आमदारांचा आक्रमक पवित्रा आणि मनपा प्रशासन ऍक्शन मोड मध्ये!

शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे : शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी महाराष्ट्राच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौक येथे तीव्र निषेध आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप म्हणाले, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा विषय हा पूर्णपणे न्यायप्रविष्ट असताना तसेच  शरद पवारसाहेबांचा या विषयाशी काहीही संबंध नसताना निव्वळ विरोधी पक्ष भाजप व भाजपचे प्रवक्ते असणारे वकील गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. जेव्हापासून  पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे राज्यातील सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या हातून गेली आहे, तेव्हापासून वारंवार फडणविसांनी वेगवेगळ्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बाबतीत टीका-टिप्पणी करण्यासाठी आपल्या बगलबच्च्यांना पुढे केले आहेत. गोपीचंद पडळकर,चित्रा वाघ, प्रसाद लाड, गुणरत्न सदावर्ते ही पूर्णपणे भाजपची पिलावळ असून देशाच्या विकासात अमुल्य योगदान देणाऱ्या देणे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल इतक्या खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नव्हते. एकीकडे ईडी, सीबीआय या सर्व केंद्रीय यंत्रणा खोट्या कारवाया करत आमच्या नेत्यांना बदनाम करत आहेत, तर दुसरीकडे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून अशा प्रकारची विधाने करून घेणे, एसटीचा संप चिघळवणे या सर्व खेळ्यानमागचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस हेच आहेत.

“आज झालेला हा हल्ला पूर्णपणे भाजप प्रणित आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी व हल्ल्याच्या मागचे नेमके सूत्रधार शोधून काढावेत” ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी केली आहे.

यावेळी संपूर्ण परीसर “देश का नेता कैसा हो …शरद पवार जैसा हो” , “महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार.. शरद पवार…” , ” पवार साहेब तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ है….” या घोषणांनी संपूर्ण जंगली महाराज रस्ता दणाणून सोडला होता.

या प्रसंगी शहराध्यक्ष  प्रशांत जगताप प्रवक्ते प्रदीप देशमुख, दिपक मानकर, रवींद्र माळवदकर,वनराज आंदेकर,महेंद्र पठारे,रुपाली ठोंबरे पाटील,महेश हांडे,मृणालिनी वाणी, गणेश नलावडे,रेखा टिंगरे,अब्दुल हाफिज,विक्रम जाधव,दिपक कामठे, आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय नेते, खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पवार साहेब यांनी विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्य वेचले. मात्र एस टी कर्मचाऱयांची दिशाभूल करून त्यांना भडकाविन्याचा प्रयत्न काही मंडळींनी सातत्याने केला. या हल्ल्यामागील असलेला “मास्टर माईंड” शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: