Pune Municipal Corporation | सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात  नोंदीच केल्या नाहीत

HomeपुणेBreaking News

Pune Municipal Corporation | सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात नोंदीच केल्या नाहीत

Ganesh Kumar Mule Jun 16, 2023 2:23 AM

PMC : 7th pay commission : वेतन लवकर करण्यासाठी प्रशासनाची लगबग  : बिल लेखनिकांना शनिवार, रविवारी काम करण्याचे आदेश 
7th pay commission : DA : PMC : सुधारित महागाई भत्ता जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनात मिळणार! 
7th Pay Commission Latest News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

Pune Municipal Corporation | सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात  नोंदीच केल्या नाहीत

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेतील (PMC Pune) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये ७ वा वेतन आयोग (7th Pay commission) लागू झाल्यानंतर आज अखेर सेवा पुस्तकात रजा नोंदी, वेतनवाढी, बोनस, महागाई भत्ता फरक, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या नोंदी, कोविड भत्ता नोंद इत्यादी सर्व नोंदी सेवापुस्तकात (Service Book Entries) आज अखेर घेतलेल्या दिसून येत नाही. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही, असे वित्त व लेखा विभागाने म्हटले आहे. तसेच जून अखेर सर्व नोंदी करण्याचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (Chief Audit Officer Ulka Kalaskar) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation), अंतर्गत अर्थान्विक्षक, पगार बिल विभागाकडे मनपा भवनामधील सर्व खात्यांची पगार बिले व बिलासंबंधी व इतर तद्नुषंगिक प्रकरणे, वेतनवाढी इत्यादी साठी सेवापुस्तके तपासणीकरीता येत असतात. (PMC Pune News)
पुणे मनपास नोव्हेंबर २०२१ मध्ये ७ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर आज अखेर सेवा पुस्तकात रजा नोंदी, वेतनवाढी, बोनस, महागाई भत्ता फरक, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या नोंदी, कोविड भत्ता नोंद इत्यादी सर्व नोंदी सेवापुस्तकात आज अखेर घेतलेल्या दिसून येत नाही. याबाबत यापुर्वी वेळोवेळी
अंतर्गत अर्थान्विक्षक, पगार बिल विभागाकडून बिल लेखनिक यांना तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
परंतु, सदरच्या नोंदी सेवापुस्तकात केल्याचे दिसून येत नाही. सदरची बाब प्रशासकीयदृष्टया गंभीर आहे. (Pune Municipal Corporation News)
त्यामुळे आता  माहे जून-२०२३ चे नियमित बिलाअखेर मागील सर्व अपूर्ण नोंदी त्वरीत सेवा पुस्तकात पुर्ण करुन घ्याव्यात, याबाबत सर्व बिल लेखनिक यांना सर्व खातेप्रमुख / प्रशासन अधिकारी/अधिक्षक/उपअधिक्षक यांनी योग्य त्या सूचना देऊन कार्यवाही करावी. असे आदेश कळसकर यांनी दिले आहेत.
——-
News Title | Pune Municipal Corporation |  Since the implementation of the 7th Pay Commission, no entries have been made in the service book of the employees of the Pune Municipal Corporation