: कालवा सल्लागार समितीचे पुणे महापालिकेला आदेश
: नियमानुसार पाणीपट्टी भरत नसल्याची पाटबंधारे विभागाची तक्रार
पाटबंधारे विभागाने समितीच्या बैठकीत केलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिका सध्या खडकवासला प्रकल्पातून १४६० एमएलडी, भामा आसखेड प्रकल्पातून १६५ एमएलडी व पवना प्रकल्पातून २७ एमएलडी असा एकूण १६५२ एमएलडी वापर करीत आहे. पुणे म.न.पा. जलसंपदा विभागाच्या विविध धरणातून (खडकवासला, पवना, भामा आसखेड) पाणीवापर करीत आहे. पुणे म.न.पा.चा एकत्रित पाणीवापर हा अनुज्ञेय पाणीवापरापेक्षा जास्त असल्याने म.ज.नि.प्रा.च्या दरानुसार जादा पाणीवापरास दीडपट व दुप्पट असे अनुज्ञेय दर आहेत. त्यानुसार भामा आसखेड प्रकल्पातून वापरलेल्या पाण्यावर दुप्पट दर लागू आहेत. परंतु दुप्पट दराने केलेली पाणीपट्टी आकारणी म.न.पा. भरत नसल्याचे अधीक्षक अभियंता व सदस्य सचिव, यांनी नमूद केले. या उलट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पाणीवापर मापदंडानुसार करत असून त्यांची पाणीपट्टी नियमितपणे जलसंपदा विभागाकडे जमा होत असते. असेही बैठकीत नमूद केले. पुणे महानगरपालिकेस शासन निर्णय दि.२७.०८.२०२० अन्वये भामा आसखेड धरणातून २.६७ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर केले आहे. त्यानुसार पुणे म.न.पा.ची सदरील पाणीवापरासाठीची योजना दि.०१.११.२०२१ रोजी कार्यान्वित झाली असून, त्याद्वारे पुणे म.न.पा.स दैनंदिन २०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणे म.न.पा.ने आता खडकवासला प्रकल्पातून करीत असलेला दैनंदिन २०० एमएलएडी पाणीवापर कमी केल्यासदरवर्षी २.६० टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यांस सिंचनासाठी उपलब्ध होईल असे सदस्य सचिव यांनी बैठकीत सांगितले. त्यावर समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे म.न.पा.ने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आदर्श घेऊन मापदंडाप्रमाणे पाणीवापर करावा व नियमितपणे पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरावी असे आदेश बैठकीत दिले.
COMMENTS