Pune Municipal Corporation (PMC) | हक्काची पदोन्नती उशिरा मिळते; आणि मिळाली तर वरिष्ठाकडून आदेश द्यायला वेळ लावला जातो

HomeपुणेBreaking News

Pune Municipal Corporation (PMC) | हक्काची पदोन्नती उशिरा मिळते; आणि मिळाली तर वरिष्ठाकडून आदेश द्यायला वेळ लावला जातो

गणेश मुळे Jan 23, 2024 2:16 AM

Health Camp | PMC pune | पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम
Arvind Shinde | Pune News | महंमदवाडी परिसराचे नाव महादेव वाडी करण्यास अरविंद शिंदे यांचा विरोध | मुख्यमंत्र्याना दिले पत्र
PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक  या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | १४  नोव्हेंबर पासून  कागदपत्रांची छाननी

Pune Municipal Corporation (PMC) | हक्काची पदोन्नती उशिरा मिळते; आणि मिळाली तर वरिष्ठाकडून आदेश द्यायला वेळ लावला जातो

| महापालिका कर्मचारी आणि अधिकारी वरिष्ठांच्या कामकाजामुळे त्रस्त!

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे | महापालिका प्रशासनातील वरिष्ठांच्या कामकाजाच्या पद्धतीला महापालिका कर्मचारी आणि अधिकारी (PMC Employees and Officers) आता कंटाळले आहेत. नोकरीत जीवापाड मेहनत करून देखील आणि पात्र असतानाही हक्काची पदोन्नती (PMC Employees Promotion) लवकर दिली जात नाही. पदोन्नती संबंधित काही प्रक्रिया पूर्ण होतात. मात्र पुन्हा वरिष्ठ रुजू करण्याचा आदेश द्यायला टाळाटाळ करतात. यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. चांगल्या काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यामुळे नैतिक घसरण (Moral Down) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनातील वरिष्ठ आपल्या कामकाज पद्धतीत बदल करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणार का, याबाबत महापालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. (Pune Municipal Corporation (PMC))
पुणे महापालिकेत (PMC Pune) झालेली सेवा आणि सेवाज्येष्ठता या आधारावर महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली जाते. पदोन्नतीने वरिष्ठ पद मिळतेच शिवाय पगारात देखील वाढ होत असते. हा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील प्रतिष्ठेचा मुद्दा असतो. त्यामुळे करियर मध्ये पुढे जाण्यासाठी कर्मचारी पदोन्नतीची वाट पाहत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यात ही दुजाभाव पाहायला मिळते. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती मिळते. काहींना तर एकाच दिवशी शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभा अशा दोन्ही समितीची मंजुरी मिळून पुढील दोन दिवसात संबंधित पदावर रुजू होण्याचा आदेश मिळतो. तर काहींना मात्र महोनमाहीने तरसत राहावे लागते. काही वेळेस पदोन्नती समितीची शिफारस, मुख्य सभेची मंजूरी मिळालेली असते. मात्र तरीही रुजू होण्याचा आदेश काही केल्या मिळत नाही. (Pune PMC News)
वरिष्ठांच्या या खेळात फक्त लेखनिकी संवर्गच नाही तर अभियांत्रिकी संवर्ग देखील भरडला जात आहे. काही आतल्या गोटातले अपवाद वगळले तर सर्वच संवर्गातील  कर्मचारी या त्रासातून जात आहेत. कधी कर्मचाऱ्यांची प्रकरणे राज्य सरकारकडे पाठवली जातात. कधी पदोन्नती देऊनही वर्षानुवर्षे त्यांना आदेशाविना ताटकळत ठेऊन आहे त्या ठिकाणी काम करायला लावले जाते. त्यामुळे वरिष्ठ आपला अहंकार बाजूला सारून आम्हाला आमचा हक्क कधी देणार, असा प्रश्न कर्मचारी विचारात आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर मात्र परिणाम होत आहे. वरिष्ठांच्या अशा मानसिक जाचाला कंटाळल्याने कर्मचाऱ्यांची नैतिक घसरण होऊ लागली आहे. महापालिकेत येऊन फक्त पाट्या टाकुयात अशी धारणा कर्मचाऱ्यांची बनत चालली आहे. वास्तविक पाहता अति वरिष्ठ जेवढी महापालिकेची जबाबदारी सांभाळत असतात त्याहूनही किंबहुना जास्त जबाबदारी खालचे कर्मचारी आणि अधिकारी पार पाडत असतात. अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाने संस्था उभी राहत असते. मात्र इथे वरिष्ठाकडून त्यांची उमेदच मारली जात आहे. पुणे महापालिकेला आणखी वरच्या स्थानावर घेऊन जाण्यासाठी वरिष्ठ आपला अंहकार बाजूला सारून आपल्याच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देतील का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.