Pune Municipal Corporation News | पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणे बंधनकारक

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation News | पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणे बंधनकारक

Ganesh Kumar Mule Jun 06, 2023 11:24 AM

Ram Mandir Ayodhya Hindi Summary |  राम मंदिर, बीजेपी और कारसेवक |  चुनौती सांस्कृतिक और राजनीतिक विविधता के धागों को एक साथ बुनने की 
Atomic Habits Book | तुम्हांला वाईट सवयी बदलायच्या आहेत आणि चांगल्या सवयी अंगिकारायच्या आहेत? तर मग Atomic Habits हे पुस्तक वाचाच! 
Atomic Habits Book Hindi Summary |  क्या आप बुरी आदतों को बदलना चाहते हैं और अच्छी आदतों को अपनाना चाहते हैं?  फिर एटॉमिक हैबिट्स किताब पढ़िए!

Pune Municipal Corporation News | पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणे बंधनकारक

| अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

Pune Municipal Corporation News | पुणे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Pune Officers and Employees) कामावर असताना ओळखपत्र (Identity) तसेच गणवेश (Uniform) परिधान करणे, बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी काही कर्मचारी मात्र हा नियम पाळताना दिसत नाही. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC additional commissioner Ravindra Binwade) यांनी कडक पाऊल उचलले आहे. कर्मचाऱ्यांनी  ओळखपत्र आणि गणवेश परिधान करण्याची जबाबदारी खाते प्रमुखांवर देण्यात आली आहे. तसेच शिस्तभंगाची कारवाई देखील खाते प्रमुख यांची करायची आहे. अतिरिक्त आयुक्तांनी नुकतेच हे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation News)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) आस्थापनेवरील विविध हुद्यांवरील सेवकांचे गणवेश हे  सुधारित गणवेश नियमावलीनुसार (Uniform Policy) निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुषंगाने संबंधित सेवकांनी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. सुधारित गणवेश नियमावलीनुसार अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग इ. कार्यालयात काम करणारे सेवक व शिपाई संवर्गातील सेवक इ. सेवकांना गणवेश अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.  तसेच संबंधित सेवकांनी गणवेश परिधान करणेबाबत  प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश प्रसृत करण्यात आलेले आहेत. तसेच याबाबत  संबंधित खातेप्रमुख / प्रशासन अधिकारी / अधिक्षक यांनी त्यांचे नियंत्रणाखालील विभागामध्ये तपासणी करण्याबाबत देखील सूचना निर्गमित केलेल्या आहेत. (PMC Pune Marathi News)

तथापि, त्याप्रमाणे संबंधित कर्मचारीवर्ग गणवेश परिधान करीत नसल्याच्या तसेच अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत पुणे महानगरपालिकेचे ओळखपत्र परिधान करीत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब कार्यालयीन शिस्तीस सोडून आहे . त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी  सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुख यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार सूचित करण्यात आले आहे कि खातेप्रमुखानी त्यांच्या  अखत्यारितील अधिकारी व कर्मचारी यांना कर्तव्यावर कार्यरत असताना मान्य गणवेश आणि ओळखपत्र परिधान करण्याबाबतचे आदेश निदर्शनास आणून द्यावेत. तसेच जे अधिकारी / कर्मचारी मान्य गणवेश
आणि ओळखपत्र परिधान करणार नाहीत, त्यांचेवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख यांची राहील. (PMC Pune Employees)
News title | Pune Municipal Corporation News |  Officials and employees of Pune Municipal Corporation are required to wear identity card and uniform