No Dues – No Objection Certificate (NOC) PMC | थकबाकी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पुणे महापालिकेकडून संगणक प्रणाली विकसित | उपायुक्त रवी पवार यांची माहिती

Homeadministrative

No Dues – No Objection Certificate (NOC) PMC | थकबाकी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पुणे महापालिकेकडून संगणक प्रणाली विकसित | उपायुक्त रवी पवार यांची माहिती

Ganesh Kumar Mule Dec 17, 2025 9:13 AM

Khadakwasla Dam | खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात किंचित वाढ | पुणेकर आणि महापालिकेची चिंता मिटली 
PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी हरकती आणि सूचनांचा पाऊस!  | शेवटच्या दिवशी जवळपास सव्वा तीन हजार हरकती 
Dr Suhas Diwase | शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी आदींनी हेल्मेट वापरावे | जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे आवाहन

No Dues – No Objection Certificate (NOC) PMC | थकबाकी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पुणे महापालिकेकडून संगणक प्रणाली विकसित | उपायुक्त रवी पवार यांची माहिती

 

PMC Election 2026 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेने ना-हरकत प्रमाणपत्रासाठी संगणक प्रणाली विकसित केलेली आहे.  nocelection.pmc.gov.in या लिंक वर click करून इच्छुक उमेदवार यांना नोंदणी करता येईल आणि आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र आणि मिळकत क्रमांक अपलोड करावा लागेल, त्यानंतर आपले ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल याची नोंद घ्यावी. ना-हरकत प्रमाणपत्र कार्यालय  ३० डिसेंबर अखेर सर्व साप्ताहिक सुट्टी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरु राहतील. अशी माहिती उप आयुक्त तथा कक्ष प्रमुख थकबाकी ना-हरकत प्रमाणपत्र कक्ष रवि पवार (Deputy Commissioner Ravi Pawar PMC) यांनी दिली. (Pune Municipal Cororation Election)

 

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक बाबत राज्य निवडणूक आयोग यांचेकडून घोषणा झालेली आहे. १५ जानेवारी  रोजी निवडणूकीची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना त्यांचे अर्ज दाखल करणेसाठी दि. २ डिसेंबर  ते ३० डिसेंबर हा कालावधी निश्चित केलेला आहे.  इच्छुक उमेदवार यांना महानगरपालिकेच्या विविध खात्याकडून कोणतीही थकबाकी येणे नाही, या बाबत ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागणार आहे. पुणे महानगरपालिकेने या कामासाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे.  इच्छुक उमेदवार यांना ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणेसाठी सावरकरभवन, पहिला मजला, येथे ना-हरकत प्रमाणपत्र कक्षामध्ये अर्ज करावयाचा आहे. सदर एक खिडकी कक्ष सकाळी ९.४५ ते सांयकाळी ६.१५ वाजेपर्यंत चालू असेल. असे उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले.
——–

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: