Pune Municipal Corporation Deposit | पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटीच्या ठेवी असताना भरमसाठ व्याजदराने ५३० कोटी रुपयांचे  कर्ज कशासाठी ?

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation Deposit | पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटीच्या ठेवी असताना भरमसाठ व्याजदराने ५३० कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी ?

कारभारी वृत्तसेवा Nov 07, 2023 8:02 AM

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम
Smart Identity Card | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘स्मार्ट ओळखपत्र’ अनिवार्य  | 10 ते 13 लाखाचा होणार खर्च 
Kondhwa Khurd Area | कोंढवा खुर्द परिसरात रस्त्यांची दुरवस्था | वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

 Pune Municipal Corporation Deposit | पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटीच्या ठेवी असताना भरमसाठ व्याजदराने ५३० कोटी रुपयांचे  कर्ज कशासाठी ?

| विवेक वेलणकर यांचा सवाल

 Pune Municipal Corporation Deposit | समाविष्ट गावांतील (Included Villages) सांडपाणी व्यवस्थापनासाठी (STP) ५३० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे नियोजन पुणे महापालिकेने (PMC Pune) केले आहे. पुणे महापालिकेच्या  तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी विविध बॅंकांमध्ये असताना भरमसाठ व्याजदराने ५३० कोटी रुपयांचे  कर्ज घेण्याचे नियोजन कशासाठी ? असा प्रश्न सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी उपस्थित केला आहे. (Pune PMC News)
वेलणकर यांनी याबाबत सांगितले कि,  मध्यंतरी माहिती अधिकारात मी पुणे महापालिकेच्या  बॅंकांमध्ये किती रकमेच्या ठेवी आहेत याची माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली.  महापालिकेच्या २२०० कोटी रुपयांच्या ठेवी ४  बॅंकांमध्ये आहेत तर ७५५ कोटी रुपये Government securities मध्ये गुंतवलेले आहेत. असं असताना ५३० कोटी रुपयांचे कर्ज भरमसाठ व्याजदराने काढण्याचे डोहाळे कशासाठी लागले आहेत हे अनाकलनीय आहे. हे कर्ज आजचे वाढते व्याजदर लक्षात घेता ९.३०- १० टक्के दराने घ्यावे लागेल जेंव्हा की महापालिकेच्या ५०० कोटी रुपयांच्या ठेवी ७.९२ टक्के दराने  बॅंकांमध्ये पडून आहेत. (PMC Pune News)
—-
       कर्ज काढायची एवढीच हौस असेल तर ठेवींच्या आधारे कमी व्याजदरात त्याच बॅंकाच कर्ज देतात या पर्यायाचा विचार करावा अशी आमची मागणी आहे.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे.