Pune MLA | PMC Officers | पुणे महापालिका अधिकाऱ्यांकडून आमदारांच्या ‘सौजन्याची ऐसीतैशी’
| अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत अधिवेशनात तक्रार
शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देणे, त्यांचेकडून आलेल्या पत्र/अर्ज/ निवेदनांना पोच देणे / त्यावर सत्वर कार्यवाही करणे, शासकीय कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणे, त्यांचे नांव निमंत्रण पत्रिकेवर छापणे इत्यादीबाबत सूचना दिनांक २७ जुलै २०१५ च्या शासन परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच लोकप्रतिनिधींना विहित कालावधीत पोच व उत्तर देण्याबाबत अधिकारी कर्मचारी यांच्याकडून टाळाटाळ व कुचराई केली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुध्द गंभीर दखल घेऊन शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत सुध्दा निदेश देण्यात आले आहेत. तसेच ३० मे, २०१८ व २१ ऑक्टोबर, २०२१ च्या परिपत्रकान्वये सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत पुन्हा
निदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात लोकोपयोगी विकासकामे करीत असताना शासकीय अधिकारी सहकार्य करीत नाहीत. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव छापत नाहीत. सन्माननीय सदस्यांनी विचारलेली माहिती त्यांना उपलब्ध करुन देत नाहीत, त्यांचे अर्ज, निवेदने, पत्र यांना प्रतिसाद देत नाहीत. बैठकांना आमंत्रित करीत नाहीत. अशा अनेक तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्याचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र
विधानसभा यांनी शासनाच्या निदर्शनास आणले आहे. (Maharashtra Winter Session)