Pune Metro | जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक हा मार्ग प्रवाशांसाठी कधी खुला होणार? | मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आला खुलासा
Pune Metro News – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गाचे उदघाटन पुढे ढकलण्यात आले आहे. शहरात पडत असलेल्या पावसाने पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान हा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याबाबत पुणे मेट्रो कडून खुलासा करण्यात आला आहे. (PM Modi Pune Visit)
मेट्रो ने म्हटले आहे कि, पुणे क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी येत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शहरातील शाळांना सुट्टी देखील जाहीर केली होती. पुणे मेट्रोच्या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी पाऊस पडून सभेला येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गाचे उदघाटन पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व बाबींचा विचार करून लवकरच जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. असे मेट्रो कडून सांगण्यात आले आहे.
COMMENTS