Pune Metro Station Parking | पुणे मेट्रोच्या ८ स्थानकांवर पार्किंगची सुविधा लवकरच उपलब्ध होणार

HomeपुणेBreaking News

Pune Metro Station Parking | पुणे मेट्रोच्या ८ स्थानकांवर पार्किंगची सुविधा लवकरच उपलब्ध होणार

गणेश मुळे Feb 15, 2024 12:14 PM

At 8 stations of the Pune Metro, parking facilities have been made available |   Pune Metro Will Open Parking Space at 8 Stations
Pune Metro News | मेट्रोसाठी  ऐतिहासिक क्षण : मेट्रो धावली मुठा नदीखालून
Cabinet approves Pune Metro Phase-1 project extension towards south from Swargate to Katraj spanning 5.46 km

Pune Metro Station Parking | पुणे मेट्रोच्या ८ स्थानकांवर पार्किंगची सुविधा लवकरच उपलब्ध होणार

 

Pune Metro Station Parking | पुणे मेट्रोच्या वतीने पिंपरी चिंचवड मेट्रो स्थानक, संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक, फुगेवाडी मेट्रो स्थानक, बोपोडी मेट्रो स्थानक, शिवाजीनगर मेट्रो स्थानक, सिविल कोर्ट मेट्रो स्थानक, मंगळवार पेठ (आरटीओ) मेट्रो स्थानक, आयडियल कॉलनी मेट्रो स्थानक येथे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे व त्या पार्किगच्या संचलनासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

स्थानक, जागा व अंदाजे पार्किंग क्षमता पुढीलप्रमाणे:

स्थानक आणि  पार्किंग क्षमता

1 PCMC Station – चारचाकी: 30, दुचाकी: 60
2 Sant Tukaram Nagar – चारचाकी: 60, दुचाकी: 78, सायकल: 42
3 Phugewadi – दुचाकी: 27
4 Bopodi- दुचाकी: 98
5 Shivaji Nagar – चारचाकी: 20, दुचाकी: 110, सायकल: 112
6 Civil Court – चारचाकी: 51, दुचाकी: 122
7 Mangalwar Peth/ RTO –  दुचाकी:73
8 Ideal Colony –  दुचाकी: 50

या सर्व पार्किंग मध्ये बूम बॅरियर, काँक्रीट फ्लोरिंग, लाईट, सीसीटीव्ही कॅमेरा ई. सुविधा देण्यात आल्या आहेत या व्यतिरिक्त अँपद्वारे बुकिंग, डिजिटल पेमेंट, पार्किंग क्षमता दर्शविणारे डिजिटल बोर्ड ई. सुविधा असणार आहेत. त्याचप्रमाणे मेट्रो मधून प्रवास केलेले वैध तिकीट असल्यास त्या प्रवाश्याना पार्कींगच्या दरामध्ये २५ % सूट मिळेल आणि महिन्याचा पार्किंग पास
सुविधा उपलबध करून देण्यात येणार आहे.

पार्किंग शुल्क (जीएसटीसह) खालीलप्रमाणे असेल (रुपयांमध्ये):

वेळ (तास) सायकल दुचाकी चारचाकी बस / हलके व्यावसायिक वाहन

२                       2    15   35    50
२ ते ६ तासांपर्यंत  5 30 50 70
६ तासापेक्षा जास्त  10 60 80 100

वरील पार्किंग शुल्क जीएसटी रकमेसह आहे. पुणे मेट्रोने त्याच दिवशी जारी केलेले वैध मेट्रो तिकीट धारण केलेल्या वापरकर्त्यांना मार्गिका -1 (पर्पल लाईन) आणि मार्गिका -2 (एक्वा लाईन) वरील सेवांसाठी पार्किंग शुल्कावर 25% सवलत दिली जाईल. मूळ / समाप्त होणारे स्टेशन हे मेट्रो स्थानक असेल ज्यावर विशिष्ट पार्किंगची जागा आहे.

तसेच तासाप्रमाणे पार्किंग सुविधेसह मासिक सदस्यता पासची सुविधा उपलब्ध आहे. जर वापरकर्त्याने सबस्क्रिप्शन कालावधीसाठी वैध मेट्रो प्रवास पास धारण केला असेल. ज्या प्रवाशांना पार्किंगच्या ठिकाणी हेल्मेट ठेवायचे आहे त्यांना २४तासांसाठी 5 रुपये असे नाममात्र हेल्मेट शुल्क असेल.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर म्हंटले की, आठ मेट्रो स्थानकांवर पार्किंग सुविधा उपलब्ध केल्याने मेट्रो प्रवाशांना नक्कीच फायदा होईल