Pune Metro Service in Ganeshotsav | गणेश उत्सवात पुणे मेट्रोला मिळाले ३ कोटीहून अधिक उत्पन्न!  | २ लाख हून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

Homeadministrative

Pune Metro Service in Ganeshotsav | गणेश उत्सवात पुणे मेट्रोला मिळाले ३ कोटीहून अधिक उत्पन्न! | २ लाख हून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

Ganesh Kumar Mule Sep 19, 2024 11:14 AM

MP Suspension | Pune Congress | १४२ खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचे लक्षण | अरविंद शिंदे
Kranti Din | क्रांति दिवस उत्साहात संपन्न | महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचा उपक्रम 
Abdul Sattar Vs NCP | Pune | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो आंदोलन”

Pune Metro Service in Ganeshotsav | गणेश उत्सवात पुणे मेट्रोला मिळाले ३ कोटीहून अधिक उत्पन्न!

| २ लाख हून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

 

Pune Metro Stations- (The Karbhari News Service) – पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शहरातील सार्वजनिक गणपती मंडळे उत्तमोत्तम देखावे तयार करत असतात. हे देखावे बघण्यासाठी शहराच्या सर्व भागांमधून तसेच पुण्याच्या बाहेरून देखील नागरिक हे देखावे बघण्यासाठी शहरात येत असतात. गणेश उत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी पुणे मेट्रोने मेट्रो सेवेचाकाळ व फेरे वाढविण्याचा निर्णय घेतला. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात वाढ करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्री पर्यंत चालवण्यात येत होती. (Pune Metro News)

या काळात मेट्रोला ३ कोटी ५ लाख ८१ हजार इतके उत्पन्न मिळाले आहे. या काळात २ लाख ४ हजार ४३४ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी १७ सप्टेंबर सकाळी ६ वा. ते १८ सप्टेंबर सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत असे २४ तास मेट्रो सेवा अखंड सुरु होती. ७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या दोन दिवसांत मेट्रो सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत, १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या चार दिवसात मेट्रो सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत तर १५ सप्टेंबर व १६ सप्टेंबर या दोन दिवसात मेट्रो सकाळी ६ ते रात्री २ पर्यंत सुरु ठेवण्यात आली होती. गणोशोत्सवात मेट्रोला प्रवाश्यांनी भरभरून पसंती दिलेली आहे. पुणे मेट्रोच्या वापराने गणेश भक्तांना पेठ भागांत गणेश मंडळांना भेट देणे सुकर झाले.

दरम्यान पीएमसी मेट्रो स्थानकावरून पीएमपीला सर्वात जास्त म्हणजे ४१ लाख ६० हजाराचे उत्पन्न मिळाले. या स्थानकावरून ३ लाख ११ हजार प्रवाशांनी प्रवास केला. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकावरून १८ लाखांचे उत्पन्न मिळाले.

गणेशउत्सव काळात ७४% प्रवाश्यांनी डिजिटल माध्यमातून तिकीटखरेदी केले. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर(भा.प्र.से.) यांनी म्हंटले आहे की, “मेट्रो प्रशासनाने गणेशउत्सवाच्याकाळात प्रवाशांसाठी मेट्रो सेवेची वेळ व फेऱ्यांच्या संख्ये मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. त्याला पुणेकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0