Pune Metro News | प्रजासत्ताक दिनाची पुणे मेट्रो कडून भेट!

Homeadministrative

Pune Metro News | प्रजासत्ताक दिनाची पुणे मेट्रो कडून भेट!

Ganesh Kumar Mule Jan 25, 2025 7:43 PM

Property Tax | PMC | 40% सवलत कायम ठेऊन आणि 3 पट शास्ती माफ करून देवेंद्र फडणवीस पुणेकरांची मने जिंकणार का?
Bilawal Bhutto Vs BJP | बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन
CM Medical Assistance Fund | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे

Pune Metro News | प्रजासत्ताक दिनाची पुणे मेट्रो कडून भेट!

| पुणे मेट्रोच्या वेळेमध्ये वाढ

 

Pune Metro Timetable – (The Karbhari News Service) – पंतप्रधान (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यातील अंतिम मर्गिकांचे लोकार्पण झाले. यामुळे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि रामवाडी ते वनाझ या दोन्ही मार्गिका पूर्णपणे सुरू झाल्या. यांवर लोकांचा वाढता वापर आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पुणे मेट्रोने (Pune Metro) आपल्या प्रवासी सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Republic Day Pune Metro Timetable)

सध्या दोन्ही मर्गिकांवरील पुणे मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी 6 ते रात्री 10 अशी आहे. तर आता  26 जानेवारी 2025 पासून या सेवेमध्ये एक तासाची वाढ करून ही प्रवासी सेवा रात्री 11 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मेट्रोची वारंवारता गर्दीच्या वेळी (स. 8 ते 11 आणि संध्या. 4 ते 8) दर 7 मिनिटांनी व कमी गर्दीच्या वेळी (स. 6 ते स. 8, स. 11 ते दु. 4 आणि रा. 8 ते रा.10) दर 10 मिनिटांनी आहे. आता रात्री 10 ते 11 या वाढलेल्या वेळेमध्ये मेट्रोची वारंवारता दर 15 मिनिटांनी असणार आहे.

पुणे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये मेट्रो कार्डचा वाढता वापर लक्ष्यात घेऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रो 26 जानेवारी 2025 रोजी एक पुणे ट्रान्झिट कार्ड फक्त 20 रुपयांना उपलब्ध करून देत आहे. या दिवशी पहिली 5000 एक पुणे ट्रान्झिट कार्ड 20 रुपयांना मिळणार आहे. या कार्ड साठी कोणत्याही कागदपत्रांची (KYC) ची आवश्यक नाही. प्रवासी आपल्या जवळच्या मेट्रो स्थानकातून हे कार्ड खरेदी करू शकतात.

——-

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर  “सध्या पुणे मेट्रोचा वाढता वापर लक्ष्यात घेऊन आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ केली आहे. रात्री कामावरून उशिरा घरी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वेळेवर पोहचणार आणि सुरक्षित असा सार्वजनिक वाहतूक पर्याय यामुळे नागरिकांना उपलब्ध होणार आहे. एक पुणे ट्रान्झिट कार्ड हे प्रजासत्ताक दिनी फक्त 20 रुपयात उपलब्ध आहे, यातून डिजिटल तिकीट पर्यायाला चालना देण्याचा प्रयत्न मेट्रो करीत आहे.”

श्रावण हर्डीकर, महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0