Pune Metro News | Pune Metro Solar Power Plant | पुणे मेट्रोने सुरु केला 4.3 मेगावॅट क्षमतेचा रूफटॉप सोलर पॉवर प्लांट

HomeBreaking Newsपुणे

Pune Metro News | Pune Metro Solar Power Plant | पुणे मेट्रोने सुरु केला 4.3 मेगावॅट क्षमतेचा रूफटॉप सोलर पॉवर प्लांट

गणेश मुळे Jan 25, 2024 3:35 PM

Dr Siddharth Dhende | संगमवाडी ते टिंगरेनगर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश
Circular | Time Bound Promotion | कालबद्ध पदोन्नती बाबतचे परिपत्रक महापालिका प्रशासनाकडून जारी |लाभ देण्यासाठी पदोन्नती समिती पुढे ठेवावी लागणार प्रकरणे
PMC RFD Project | पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी पुणे महापालिकेचा निषेध करत घातले सजीव घटकांचे श्राद्ध

Pune Metro News | Pune Metro Solar Power Plant | पुणे मेट्रोने सुरु केला 4.3 मेगावॅट क्षमतेचा रूफटॉप सोलर पॉवर प्लांट

| रेंज हिल डेपो येथील सौरऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू

 

Pune Metro News |Pune Metro Solar Power Plant | पुणे मेट्रो प्रकल्पाच्या (Pune Metro Rail Project) एकूण १० मेट्रो स्थानकांवर (वनाझ, आनंद नगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी, कासारवाडी आणि फुगेवाडी) तर २ देखभाल डेपो (रेंज हिल डेपो, हिल व्ह्यू पार्क डेपो वनाझ ) येथे सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मितीचे पॅनल (Pune Metro Solar Panel) बसविण्यात आलेले आहे. आज, 25 जानेवारी रोजी, रेंज हिल डेपो येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे (Pune Metro Solar Power Plant) सोलर पॉवर प्लांट) उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  या सौर ऊर्जा प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर स्थानके आणि डेपोच्या संचलनासाठी होणार आहे. (Pune Metro News |Pune Metro Solar Power Plant)

या उदघाटन प्रसंगी पुणे मेट्रोचे संचालक श्री. अतुल गाडगीळ (कार्य), श्री. विनोदकुमार अग्रवाल (संचलन व प्रणाली), कार्यकारी संचालक श्री. राजेश द्विवेदी (संचालन आणि देखभाल), डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन आणि जनसंपर्क) यांच्यासह जमतानी प्रोझ्युमर्स सोलर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनुप झमतानी तसेच श्री वीरेंद्र भागवत हे देखील उपस्थित होते. (Pune Metro Stations)

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये दोन मार्गिका आहेत. ज्यामध्ये पर्पल मार्गिका (उत्तर-दक्षिण) आणि एक्वा मार्गिका (पूर्व -पश्चिम) यांचा समावेश आहे. ज्याची एकूण लांबी 33.2 किमी आणि त्यांत 30 स्थानके आहेत. ह्या मार्गिकामधील उन्नत विभागाची लांबी 27.2 किमी आणि भूमिगत विभागाची लांबी 6 किमी आहे. पुणे मेट्रोचे रेंज हिल्स डेपो आणि वनाझ येथील हिल व्ह्यू पार्क डेपो असे 2 देखभाल डेपो आहेत. (Pune Metro Online Ticket)

पर्पल मार्गिकेवरील पीसीएमसी ते फुगेवाडी (७ किमी, ५ स्थानके) आणि एक्वा मार्गिकेवरील वनाज ते गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक (५ किमी, ५ स्थानके) या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ०६ मार्च २०२२ रोजी तर फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय (६.९१ किमी, ४ स्थानके) आणि गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक ते रुबी क्लिनिक ( 4.75 किमी, 7 स्टेशन) या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन १ ऑगस्ट २०२३ रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय दर्जाची ऊर्जा-कार्यक्षम मेट्रो रेल्वे व्यवस्था स्थापन करणे हे पुणे मेट्रोचे ध्येय आहे. पुण्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे व शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणे आणि पुणेकरांचे जीवनमान अधिक चैतन्यशील आणि आकर्षक बनवणे हा या प्रणालीचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सौर आणि पवन ऊर्जेसह ‘हरित ऊर्जेच्या’ निर्मितीचा आणि पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा पुणे मेट्रो प्रयत्न करते.

200 kWp क्षमतेचा पहिला सोलर प्लांट फेब्रुवारी 2022 मध्ये संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनवर बसवण्यात आला आणि भविष्यात पुणे मेट्रो प्रामुख्याने हरित उर्जेवर चालणारी मेट्रो असू शकेल. 4300 kWp सौर प्रकल्पातून वार्षिक 7 दशलक्ष युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे, परिणामी कार्बन उत्सर्जनात मोठी बचत होईल. मे. झामतानी प्रोझ्युमर्स सोलर प्रा. लि.ने पुणे मेट्रोसाठी रेस्को मोड अंतर्गत सोलार प्लांट बसवला आणि त्या प्लांटचे संचलन कंपनी पुढील 25 वर्षे करणार आहे. या प्रकल्पात सर्वोत्कृष्ट सोलर मॉड्यूल्सचा वापर करण्यात आला. रेंज हिल डेपो IWB (758 KWp) येथे सौर पॅनेल सुरू होण्यापूर्वी, सरासरी ऊर्जा निर्यात अंदाजे 1000-1300 युनिट्स/दिवस होती. 20 जानेवारी 2024 रोजी रेंज हिल डेपो IWB (758 KWp) येथे सौर पॅनेल कार्यान्वित झाल्यापासून, सरासरी ऊर्जा निर्यात अंदाजे 4300 युनिट्स/दिवस झाली आहे. सौर पॅनेलद्वारे दररोज सरासरी वीज निर्मिती 15557 युनिट्स (किलो वॅट) इतकी आहे. यामुळे दरवर्षी 6.53 करोड रुपयांची वीजबिलात बचत होणार आहे.

———–

 “महा मेट्रो शक्य तितकी हरित ऊर्जा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. यामुळे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.”

श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो