Pune Metro Record | गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला उदंड प्रतिसाद| २.६२ लाखांहून अधिक भाविकांनी केला मेट्रोने प्रवास
Pune Metro News – (The Karbhari News Service) – गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात पुणेकरांनी यंदाही सार्वजनिक वाहतुकीला, विशेषतः पुणे मेट्रोला मोठी पसंती दिली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी तब्बल *२,६२,६७१ प्रवाशांनी* पुणे मेट्रोने प्रवास केल्याची माहिती महा मेट्रो प्रशासनाने दिली आहे. (Pune Metro Ganeshotsav 2026)
गतवर्षी २०२४ मध्ये पहिल्या दिवशी २,१६,३७४ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. या तुलनेत यंदा पहिल्याच दिवशी *४६,२९७ प्रवाशांची वाढ* झाली असून एकूण प्रवासी संख्येत *२१.४० टक्के वाढ* नोंदवली गेली आहे.
*कोणत्या स्थानकावर किती गर्दी? (रात्री ११ वाजेपर्यंतची आकडेवारी)*
पुणे मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, इंटरचेंज स्टेशन असलेल्या जिल्हा न्यायालय आणि मध्यवर्ती असलेल्या मंडई स्थानकावर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली.
– *एकूण प्रवासी:* २,६२,६७१ (२१.४०% वाढ)
– *जिल्हा न्यायालय (District Court) स्थानक:* ५८,९४८ प्रवासी (२१.८९% वाढ)
– *महात्मा फुले मंडई स्थानक:* ५१,५३३ प्रवासी – सर्वाधिक (२१.७३% वाढ)
– *पीसीएमसी (PCMC) स्थानक:* २५,४२९ प्रवासी
– *रामवाडी स्थानक:* २३,६४४ प्रवासी
– *स्वारगेट स्थानक:* २१,०९९ प्रवासी
– *पीएमसी (PMC) स्थानक:* १९,२६७ प्रवासी
*गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन*
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रो प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.
१. *दर ५ मिनिटांनी सेवा:* गर्दीचे नियोजन करण्यासाठी मेट्रोची वारंवारता वाढवण्यात आली असून आता दर ५ मिनिटांनी मेट्रो धावत आहे.
२. *रात्री उशिरापर्यंत सेवा:* गणपती देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी रात्री उशिरापर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
पुणे मेट्रोचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे.
*दर्शनासाठी या स्थानकांचा वापर करा:* कसबा पेठ, स्वारगेट, पीएमसी, डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान
> *परतीसाठी:* गर्दी टाळण्यासाठी परतीच्या प्रवासासाठी प्रामुख्याने महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाचा वापर करा.
> *तिकीटासाठी:* स्थानकावरील रांगा टाळण्यासाठी QR कोड, मेट्रो ॲप किंवा WhatsApp तिकिटाचा वापर करा.
(Source: punemetrorail.org)

COMMENTS