Pune Mayor Election | पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक आता ९ फेबुवारीला | स्थायी समिती व विशेष समित्यांच्या सदस्यांची देखील केली जाणार नियुक्ती

Homeadministrative

Pune Mayor Election | पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक आता ९ फेबुवारीला | स्थायी समिती व विशेष समित्यांच्या सदस्यांची देखील केली जाणार नियुक्ती

Ganesh Kumar Mule Jan 29, 2026 8:34 PM

Pune Traffic News | कोरेगाव पार्क, बंडगार्डन मधील वाहतूक समस्या सोडवा | वाहतूक विभागास १०जुलैपर्यंत अंतिम मुदत
Pune News | टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाही!
Pune BDP – Hill Top Hill Slope | हील टॉप हील स्लोप आणि बीडीपी बाबत एकत्रित धोरण ठरवणार | नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

Pune Mayor Election | पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक आता ९ फेबुवारीला | स्थायी समिती व विशेष समित्यांच्या सदस्यांची देखील केली जाणार नियुक्ती

 

Pune Dy Mayor Election – (The Karbhari News Service) – पुण्याचा महापौर आणि उपमहापौर हे ६ फेब्रुवारीला ठरणार होते. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. या दोन्ही पदाची निवडणूक ही ९ फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित असणार आहेत. दरम्यान यासाठी नामनिर्देशन ३ फेब्रुवारीला दाखल केले जाणार आहे. तसेच याच दिवशी  स्थायी समिती व विशेष समित्यांच्या सदस्यांची देखील नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक महापालिका नगरसचिव विभागाकडून जारी करण्यात आले आहे. (Pune PMC News)

पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकीनंतरची पहिली सभा (विशेष बैठक) सोमवार, ९ फेब्रुवारी  रोजी सकाळी ११.०० (अकरा) वाजता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात (पुणे महानगरपालिकेच्या नविन विस्तारीत इमारतीतील सभागृहात) विभागीय आयुक्तयांचे आदेशानुसार जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९(१) अन्वये महापौर व उपमहापौर या पदांची निवडणूक या सभेत होईल.

महाराष्ट्र महानगरपालिका ( महापौर पदाचे आरक्षण) नियम २००६ अन्वये पुणे महानगरपालिकेचे महापौर पद – महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे.

 

महाराष्ट्र महानगरपलिका अधिनियम १९४९ चे कलम २० अन्वये स्थायी समितीवर व कलम ३० (१) अन्वये सहा विशेष समित्यांवर पालिका सदस्यांचे नामनिर्देशन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३१अ अन्वये महानगरपालिका मान्यताप्राप्त पक्षांचे अथवा नोंदणीकृत पक्षांचे किंवा गटांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेईल आणि सभागृहनेता, विरोधी पक्षनेता व अशा प्रत्येक पक्षाचा किंवा गटाचा नेता यांच्याशी विचारविनियम करुन शक्यतोवर महानगरपालिकेतील अशा पक्षांच्या किंवा गटांच्या संख्याबळाच्या प्रमाणात सदस्यांचे नामनिर्देशन करता येईल.

महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र पत्र दाखल करण्याचा वार व दिनांक  | मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ | नगरसचिव, नगरसचिव कार्यालय पुणे | सकाळी ११.०० ते दुपारी २.००

१) स्थायी समितीवर एकूण १६ सदस्य नियुक्त करावयाचे आहेत.
२) प्रत्येक विशेष समितीवर एकूण १३ सदस्य नियुक्त करावयाचे आहेत.
३) महिला व बाल कल्याण समितीवर एकूण १३ सदस्य नियुक्त करावयाचे असून त्यापैकी ७५% सदस्य महिला सदस्या नियुक्त करावयाच्या आहेत.
४) विशेष समित्यांच्या कामकाज नियमावली नियम क्र. ६८ अन्वये एका सभासदास दोन पेक्षा अधिक समित्यांवर नियुक्त करता येणार नाही.

असे परिपत्रकात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: