Pune Mahanagarpalika Bharti 2023 : परीक्षेच्या तारखा जाहीर | जाणून घ्या किती सत्रात होणार परीक्षा ?

HomeBreaking Newsपुणे

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : परीक्षेच्या तारखा जाहीर | जाणून घ्या किती सत्रात होणार परीक्षा ?

Ganesh Kumar Mule May 31, 2023 2:20 PM

BARTI | Pune | बार्टी मार्फत मिळणार रोजगार व स्वयंरोजगाराचे नि:शुल्क प्रशिक्षण
BARTI | अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय व्यावसायिक स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण
BARTI Pune Fellowship फेलोशिप बाबत बार्टीचा सकारात्मक प्रतिसाद ; पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : परीक्षेच्या तारखा जाहीर | जाणून घ्या किती सत्रात होणार परीक्षा ?

Pune Mahanagarpalika Bharti 2023 :  (Author: Ganesh Mule) : पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  ३२० पदांसाठी महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता  परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या संभाव्य तारखा महापालिकेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षा किती सत्रात घेतल्या जाणार आहेत. याबाबत ही महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.  (Pune Mahanagarpalika Bharati 2023)

कधी होणार उमेदवारांची परीक्षा?

सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (PMC Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिलेल्या माहितीनुसार काही पदांची परीक्षा ही २२ जून ला होणार आहे. तर काही पदांची परीक्षा ही २ जुलै ला होणार आहे. (Pune municipal corporation Recruitment)

२२ जून ला या पदांच्या परीक्षा होतील

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) 
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी 
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय)

४) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) 
५ ) अग्निशामक विमोचक / फायरमन

६) कनिष्ठ अभियंता (विद्युत)

२ जुलै ला या पदांच्या परीक्षा होतील

१) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक 
२) पशु वैदयकीय अधिकारी
३) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर 
४) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर  
५) औषध निर्माता 

युजर आयडी आणि पासवर्ड कधी पाठवला जाणार?

उपायुक्त इथापे यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षेच्या तारखा दिवशी परीक्षा या तीन सत्रात घेतल्या जाणार आहेत. उमेदवारांना परीक्षेच्या किमान ७ दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी SMS/Email द्वारे युजर आयडी आणि पासवर्ड पाठवण्यात पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावरून प्रवेशपत्र मिळवता येतील. परीक्षा केंद्र, दिनांक, व कालावधी याचा तपशील प्रवेश पत्रावर नमूद केलेप्रमाणे असेल. याबाबत उमेदवारांना वेळोवेळी सूचित केले जाईल. (PMC pune Recruitment exam 2023)

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली होती.  पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी  वाढवण्यात आला होता. 30 एप्रिल पर्यंत कालावधी देण्यात आला होता. (PMC Pune Bharti 2023) 

 

भरती प्रक्रियेत किती अर्ज प्राप्त झाले? 

 एवढ्या कालावधीत महापालिकेकडे 10744 अर्ज आले होते. त्यातील 10171 अर्ज पात्र झाले आहेत. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. या भरती प्रक्रियेत फायरमन च्या सर्वात जास्त जागा आहेत. फायरमन च्या 200 जागांसाठी एकूण 3738 अर्ज आले, त्यातील 3555 पात्र झाले आहेत. त्या खालोखाल औषध निर्माता पदासाठी 3148 अर्ज आले. त्यातील 3032 पात्र झाले आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) साठी 1853 अर्ज आले. त्यापैकी 1677 पात्र झाले आहेत. आरोग्य निरीक्षक साठी 771 अर्ज आले त्यातील 738 पात्र झाले. वैद्यकीय अधिकारी पदासाठी 465 अर्ज आले. त्यातील 450 पात्र झाले. (Pmc Pune recruitment 2023) 

 

– पदे आणि अर्जाची संख्या 

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) – 12
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – 450
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय) – 9
४) पशु वैदयकीय अधिकारी – 47
५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक – 209
६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 1677 
७) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर – 738 
८) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर – 216 
९) औषध निर्माता – 3032
१०) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – 226 
११) अग्निशामक विमोचक / फायरमन – 3555


News Title | Pune Mahanagarpalika Bharti 2023 : Exam Dates Announced | Know how many sessions will be the exam?