Pune Lohegaon Reservation | महत्वाची आरक्षणे रद्द करून तिथे भारत मंडपम चे आरक्षण प्रस्तावित करणे ही लोकांच्या हक्कावर गदा!

Homeadministrative

Pune Lohegaon Reservation | महत्वाची आरक्षणे रद्द करून तिथे भारत मंडपम चे आरक्षण प्रस्तावित करणे ही लोकांच्या हक्कावर गदा!

Ganesh Kumar Mule Mar 23, 2026 8:18 AM

Dy Mayor Parshuram Wadekar | दर महिन्यास होणाऱ्या पहिल्या मुख्य  सभेमध्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले जावे | उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा मुख्य सभेत प्रस्ताव 
PMC Sky Sign Policy | जाहिरात शुल्क सुधारित करण्याबाबतचे सर्व प्रस्ताव मुख्य सभेने एक महिना पुढे ढकलले | नवीन नगरसेवक घेणार निर्णय 
Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांच्या शिल्प आणि पुतळा दुरुस्ती बाबत मुख्य सभेत चर्चा 

Pune Lohegaon Reservation | महत्वाची आरक्षणे रद्द करून तिथे भारत मंडपम चे आरक्षण प्रस्तावित करणे ही लोकांच्या हक्कावर गदा!

| विवेक वेलणकर, सारंग यादवाडकर यांचे सर्वपक्षीय नगरसेवकांना जाहीर आवाहन

 

PMC General Body Meeting – (The Karbhari News Service) – आज होणाऱ्या पुणे महापालिका सर्वसाधारण सभेपुढे लोहगाव सर्व्हे नंबर २३६,२३८ मधील जनतेसाठी अत्यंत महत्वाची मंडई , हाॅस्पिटल, उद्यान, पार्किंग , डीपी रोड , क्रीडांगण, पाणीपुरवठा केंद्र ही आरक्षणे रद्द करुन त्याऐवजी भारत मंडपम ( कन्व्हेन्शन सेंटर) साठी आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. शहराच्या कोणत्याही भागातील नागरीकांना आपले दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरीता मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी विकास आराखड्यात ही महत्त्वाची आरक्षणे ठेवली जातात. मात्र ती रद्द करुन त्याऐवजी भारत मंडपम सारखे आरक्षण प्रस्तावित करणे म्हणजे नागरीकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे. अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि सारंग यादवाडकर यांनी केली आहे. तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांना आवाहन केले आहे कि हा प्रस्ताव मंजूर करू नये. (Pune PMC News)

वेलणकर यांनी म्हटले आहे की, अनेक नागरीकांनी महापालिकेने यासंदर्भात आयोजित जनसुनावणीत या बदलाला विरोध दर्शवला आहे. महत्वाचे म्हणजे महापालिकेच्याच मंडई , प्रकल्प , उद्यान या विभागांनीही या आरक्षण बदलाला विरोध दर्शवला आहे आणि मूळ आरक्षण अंमलात आणण्यासाठी भूसंपादन करण्याचा आग्रह धरला आहे.

या आरक्षण बदलामुळे विमानतळ परीसरात आजही होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणखी वाढणार आहे , कारण अनेक प्रस्तावित रस्ते रद्द करण्यात आले असून यासाठी कोणताही वाहतूक अभ्यास केला गेलेला नाही. याचा थेट परिणाम म्हणून तेथील नागरीकांचे तसेच सर्वच पुणेकरांचे जीवन दुष्कर होणार आहे याची नोंद घेऊन आपण सर्वांनी हा आरक्षण बदलाचा ठराव रद्द करण्यासाठी आग्रह धरावा आणि तातडीने भूसंपादन करुन मूळ आरक्षणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास भाग पाडावे. असे आवाहन वेलणकर आणि यादवाडकर यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना केले आहे.
—-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: