Pune Illegal Hoardings | जुना बाजार चौक आणि आर.टी.ओ. चौकात धोकादायक होर्डिंग! | बेकायदेशीर होर्डिंग आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची अविनाश बागवे यांची मागणी! 

HomeBreaking Newsपुणे

Pune Illegal Hoardings | जुना बाजार चौक आणि आर.टी.ओ. चौकात धोकादायक होर्डिंग! | बेकायदेशीर होर्डिंग आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची अविनाश बागवे यांची मागणी! 

गणेश मुळे May 18, 2024 2:08 PM

Pune Ganeshotsav | श्री शिवाजी चौक मित्र मंडळाचा बेलूरच्या चेन्नाकेशव मंदिराचा देखावा | गणेश भक्तांचे ठरतोय आकर्षण!
Integrated Food Security Scheme | राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे धान्य मोफत; लाभ घेण्याचे आवाहन
PMC Fireman Bharti | उमेदवारांच्या हरकतीवर महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद | लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार

Pune Illegal Hoardings | जुना बाजार चौक आणि आर.टी.ओ. चौकात धोकादायक होर्डिंग! | बेकायदेशीर होर्डिंग आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची अविनाश बागवे यांची मागणी!

| महापालिका आयुक्त कार्यालयाने प्रशासनाकडून मागवला अहवाल

Avinash Bagwe Pune Congress – (The Karbhari News Service) –  पुणे रेल्वे प्रशासनाच्या जागेत जुना बाजार चौकात व आर.टी.ओ. चौकात मोठ्या प्रमाणात होर्डींग उभे आहेत. आर टी ओ चौकातील होर्डिंग हे भूसभुशीत मातीच्या धिगाऱ्यावर उभे आहे जे मोठ्या पाऊस वाऱ्यात कधीही कोसळून जीवितहानी होवू शकते. हे दोन्ही होर्डिंग्ज वाहतूक सिग्नल लागत असल्यामुळे अधिक धोकादायक आहे. हे आणि शहरातील इतर बेकायदेशीर होर्डिंग काढावे. तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी. अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. यावर आयुक्त कार्यालयाने आकाशचिन्ह विभागाकडून अहवाल मागवला आहे. (PMC Sky Sign Department)
बागवे यांच्या पत्रानुसार  पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत अनेक बेकायदेशीर होर्डींग उभे आहेत. वास्तविक पाहता मुंबईमध्ये घाटकोपर या ठिकाणी होर्डींग कोसळून मोठी दुर्घटना झाली, त्यामध्ये निष्पाप १६ जणांचा बळी गेला असून ८० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेचा बोध येऊन पुणे मनपाने पुणे शहरातील सर्व होर्डींगची तपासणी करून जे बेकायदेशीर व अनाधिकृत होर्डिंग उभे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी हे अत्यंत गरजेचे आहे.
MMC act व महाराष्ट्र राज्य बांधकाम विकास नियमावली नुसार कुठल्याही इमारतीच्या बांधकामाच्या फ्रंट मार्जिन, तसेच साईड मार्जिन मध्ये पार्किंग व्यतिरिक्त कोणत्याही स्ट्रक्चर उभे करण्यास अनुमती नाही हे मी विचारलेल्या लेखी प्रश्नात पुणे मनपाच्या मुख्य सभेत अधिकाऱ्यांनी कबूल देखील केलेले आहे. असे असताना प्रशासनाची स्पेशल परवानगी घेऊन साईड व फ्रंट मार्जिन मध्ये असणाऱ्या होल्डिंगला परवानगी देण्यात आली व अशी पळवाट काढण्यात आली की, त्या ठिकाणी आयुक्तांनी आदेश दिले की वाहतुकीला व पार्किंगला अडथळा निर्माण होणार नाही.  परंतु राज्य सरकारने 2018 मध्ये जे बांधकाम विकास नियमावलीची मान्यता दिली होती. त्यामध्ये त्यांनी या दोन्ही गोष्टींचा कुठेही उल्लेख केलेला नाही, यामुळे बेकादेशीर रित्या राज्य सरकारच्या आदेशाच्या विरुद्ध हे होल्डिंग उभे आहेत.
बागवे यांनी पुढे म्हटले आहे कि तसेच सद्यस्थितीत राज्य परिवहन, रेल्वे प्रशासन, नदीपात्र व इतर शासकीय जागांमध्ये मोठ्या प्रमाणात उभे असलेले होर्डींग MMC Act section 244, 245 तसेच AIRC (All India Road Congress) चे अनेक मार्गदर्शक तत्त्व, तसेच नियमांचे उल्लंघन करणारे आहेत, परंतु मनपा प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे, हे अनाकलनीय आहे.
काही वर्षांपूर्वी पुणे शहरातील मंगळवार पेठ येथील मालधक्का चौकातील एक होर्डिंग कोसळून तीन निष्पाप लोकांचा बळी गेला होता तेव्हा मनपाने काही प्रमाणात होर्डींगवर कारवाई देखील केली होती. परंतु, पुन्हा प्रशासनाच्या सहकार्याने अनेक बेकायदेशीर होर्डींग मोठ्‌या प्रमाणात पुणे शहरात उभे आहेत.

हा अपघात झाला होता त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक होर्डींग सद्यस्थितीत उभे आहेत. महानगरपालिकेने जे 40 x 40 पेक्षा जास्त व 120×80 चे मोठे होर्डींग उभे आहेत. पुणे रेल्वे प्रशासनाच्या जागेत जुना बाजार चौकात व आर.टी.ओ. चौकात मोठ्या प्रमाणात होर्डींग उभे असून, आर टी ओ चौकातील होर्डिंग हे भूसभुशीत मातीच्या धिगाऱ्यावर उभे आहे जे मोठ्या पाऊस वाऱ्यात कधीही कोसळून जीवितहानी होवू शकते आणि हे दोन्ही होर्डिंग्ज वाहतूक सिग्नल लागत असल्यामुळे अधिक धोकादायक आहे. इतर शासकीय संस्थाची परवानगी मिळाली या नावाखाली असे होर्डींग उभे केले आहेत.
वास्तविक पाहता राज्य सरकारची होर्डींग पॉलिसी, ऑल इंडिया रोड काँग्रेसचे नुसार कोणतीही संस्था असेल परिवहन विभाग / रेल्वे विभाग व इतर यांच्या रस्त्याच्या दर्शनी भागात कोणतेही होर्डींग असतील तर त्याची परवानगी स्थानिक प्लॅनिंग अथॉरिटी कडून घेणे बंधनकारक आहे आणि जे प्लॅटफॉर्म किंवा रेल्वे स्थानकाच्या आवाराकडे आतील बाजूस असतील त्यांना परवानगीघेण्याची आवश्यकता नाही. असा कायदा असताना चुकीच्या पद्धतीने वेगवेगळ्या अधिकच्या आकाराचे होर्डींग उभे केले जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्व बाबी लक्षात घेवून आपण हे बेकायदेशीर होर्डिंग त्वरित काढून टाकावे व याला मदत करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. व आपण केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल आम्हाला द्यावा. अशी मागणी बागवे यांनी केली होती. त्यानुसार आयुक्त कार्यालयाने याची गंभीर दखल घेत आकाशचिन्ह विभागाकडून अहवाल मागवला आहे.