Pune Illegal Construction | बिबवेवाडी, पर्वती परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 24,400 चौ.फूट बांधकाम पाडले!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे पेठ बिबेवाडी, मुकुंदनगर, पर्वती येथे फ्रंट मार्जिन व कच्चे बांधकाम वर आज बांधकाम विकास विभाग झोन 5 यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune News)
या ठिकाणी 32 नोटीस देऊन कारवाई मध्ये सुमारे 24,400 चौ.फूट विनापरवाना अनधिकृत क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.
कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता, बांधकाम विभाग झोन क्र.5 चे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक व इतर स्टाफ, सहा. पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने व दोन जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी, एम एस एफ. दल यांचे सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.

COMMENTS