Pune Hills | टेकड्यांवर राडारोडा टाकणे थांबवा | आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी  

HomeBreaking News

Pune Hills | टेकड्यांवर राडारोडा टाकणे थांबवा | आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी  

Ganesh Kumar Mule Jul 14, 2025 10:18 PM

Domestic Water Use | पाणी कोटा १६.५२ TMC करण्याची महापालिकेची पाटबंधारे कडे मागणी
Pune PMC News | शालेय स्वछता साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेत विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवल्याचा आरोप | निविदा तत्काळ रद्द करण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी! 
Viksit Bharat Sankap Yatra | विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून महानगरपालिकेद्वारे विविध योजनांचा लाभ

Pune Hills | टेकड्यांवर राडारोडा टाकणे थांबवा | आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

 

MLA Siddharth Shirole – (The Karbhari News Service) – बांधकामाचा राडारोडा टाकून शहर आणि भोवतालच्या टेकड्या विद्रुप करण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारने ते थांबवावेत, अशी मागणी आज विधानसभेत बोलताना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. (Pune News)

शहराचा विस्तार वेगाने होतोय. बांधकामेही वेगाने होत आहेत. या बांधकामांवरील राडारोडा टेकड्यांवर टाकला जातोय. ठेकेदार हा राडारोडा टाकत आहेत. राडारोड्यामुळे टेकड्या विद्रुप होत आहेत. याकरीता मंत्री महोदयांनी सर्व वन अधिकाऱ्यांना सांगून याबाबतचा अहवाल मागवावा आणि कारवाई करावी, अशी मागणी शिरोळे यांनी  केली.

टेकड्यांचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी केलेल्या मागणीला वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वन खात्याकडून टेकड्यांवरची माती काढू दिलीच जाणार नाही. मोठमोठ्या शहरांमधून जुने बांधकाम पाडल्यावर राडारोडा टाकण्याचे काम टेकड्या आणि इतरत्र होत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी राडारोडा विल्हेवाट यंत्रणा उभी करण्याचे काम चालू झाले आहे. शहरांच्या हद्दीपाशी वनखाते, पोलीस खाते आणि महसूल खाते यांचे अधिकारी देखरेख ठेवतील. सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. राडारोडा वन विभागाच्या जमीनीवर तसेच अन्यत्र टाकू दिला जाणार नाही, हे स्पष्ट करतो, असे आश्वासन गणेश नाईक यांनी दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: