Pune Grand Cycle Tour | एका रस्त्याच्या सौन्दर्यीकरणासाठी १.८९ कोटी रुपये! | पुणेकरांचा कररुपी पैशाची काळजी घ्या | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Homeadministrative

Pune Grand Cycle Tour | एका रस्त्याच्या सौन्दर्यीकरणासाठी १.८९ कोटी रुपये! | पुणेकरांचा कररुपी पैशाची काळजी घ्या | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Sep 16, 2025 7:29 PM

MPSC Exam Result | राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर ; | मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी
Swarget Katraj Metro | Pune News | स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार | मंत्री उदय सामंत
School Timing | सर्व शाळांची वेळ सकाळी नऊ करणे गैरसोयीचे| पालक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालकांचा विरोध

Pune Grand Cycle Tour | एका रस्त्याच्या सौन्दर्यीकरणासाठी १.८९ कोटी रुपये! | पुणेकरांचा कररुपी पैशाची काळजी घ्या | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

 

 

PMC Road Department – (The Karbhari News Service) – “पुणे ग्रँड सायकल टूर” या स्पर्धेसाठी शहरातील ६४.८० किमी रस्त्यासाठी तब्बल ₹१२२.९७ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, म्हणजेच प्रति किमी रस्त्याचा दुरुस्ती व सौंदर्यकरणासाठी १.८९ कोटी रुपये. प्रत्यक्षात नवीन दोन लेन ५ ते ७ मीटर रुंदीचा डांबरी रस्ता बांधण्यासाठी जास्तीत जास्त ₹३ कोटी प्रत्येक किमी साठी पुरेसे असतात. त्यामुळे पुणेकरांचा कररुपी पैशाची काळजी घ्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी महापलिका आयुक नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

माजी नगरसेवकांच्या निवेदना नुसार  या विषयात रस्त्याचे  फक्त दुभाजक रंगवणे, थर्मोप्लास्ट पट्टे मारणे, साइन बोर्ड लावणे व खड्डे दुरुस्ती किंवा अस्तरीकरण करण्याच्या नावाखाली आधीच सुस्थितीत असणारे रस्त्यांवर दर किमीला १.८९ कोटी/किमी अवास्तव खर्चाचे इस्टीमेट, इस्टीमेट कमिटी मध्ये मान्य होते. त्यामुळे या फुगविलेल्या इस्टीमेटची पुन्हा पडताळणी करून सुधारित आवश्यक रकमेच्या निविदा काढाव्यात व पुणेकरांचा कररुपी पैशाची काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरवर्षी “मेंटेनन्स” व “रिइन्स्टेटमेंट” या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कामे प्रत्येक १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर होतात. (१५ क्षेत्रीय कार्यालय एकूण कामे :- ४० कोटी) या पण कामांचे स्वरूप पॅकेज मधील निविदेप्रमाणेच आहे. तर मग याच कामांतून सायकल स्पर्धेसाठी आवश्यक कामे केली तर महानगरपालिका तिजोरीतील सर्वसामान्य करदात्यांचे 125 कोटी रुपये वाचतील तसेच महानगरपालिकेच्या डांबर प्लांट वरून रोज हजारो मेट्रिक टन डांबर,इमलशन व इतर सामग्री शहराच्या वेगवेगळ्या भागात वापरली जाते तो माल वापरून पण योग्य नियोजनातून कामे करणे शक्य आहे.

तरी आपण या संपूर्ण देखभाल दुरुस्तीच्या टेंडरचा फेरविचार करावा. यातील बहुतांश रस्ते हे काँक्रीटचे आहेत. मग काय या काँक्रीटच्या सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करणार? या सायकल स्पर्धेच्या नावाखाली आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करत आहेत. असे देखील निवेदनात माजी नगरसेवकांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: