Jitendra Dudi IAS | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांची बदली | पुण्याला मिळाले नवीन जिल्हाधिकारी
Dr Suhas Diwase IAS – (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी आता पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डुडी (Jitendra Dudi IAS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने या बाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune News)!
सरकारच्या वतीने डॉ दिवसे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती नंतर त्यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे. हे पद सध्या निरंजन कुमार सुधांशू यांच्याकडे होते.
जितेंद्र डुडी हे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. आता संतोष पाटील (Santosh Patil IAS) हे साताऱ्याचे जिल्हाधिकारी असतील. पाटील यांच्याकडे पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी होती.
COMMENTS