Pune Election Commission | निवडणूक यंत्रणेची मदत आणि चेहऱ्यावर मतदान केल्याचा आनंद

HomeपुणेBreaking News

Pune Election Commission | निवडणूक यंत्रणेची मदत आणि चेहऱ्यावर मतदान केल्याचा आनंद

गणेश मुळे May 13, 2024 8:47 AM

Murlidhar Mohol Vs Congress |  मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल
Pune Election 2024| निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
State Election Commission | दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

Pune Election Commission | निवडणूक यंत्रणेची मदत आणि चेहऱ्यावर मतदान केल्याचा आनंद

 

Pune Loksabha 2024 – (The Karbhari News Service) – सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या नचिकेतचे मतदान केंद्र घराजवळ नसल्याने ते बदलून घराजवळचे मतदान केंद्र द्यावे किंवा वाहनाची व्यवस्था करावी अशी विनंती पालकांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे केलेली. या विनंतीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी तात्काळ प्रतिसाद देत मदतनीसासह वाहन नचिकेतकडे पाठवून त्याला मतदानासाठी बूथवर आणण्याची व्यवस्था केली. मतदानानंतरचा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. (Maharashtra State Election Commission)

शारीरिकदृष्ट्या विकलांग (पीडब्ल्यूडी) मतदार असलेला नचिकेत शहरातील फ्लोरिडा इस्टेट केशव नगर, मुंढवा येथील रहिवासी आहे. त्याचे मतदार यादीतील नाव यादी भाग ३१- केशवनगर मुंढवा लिटिल आइन्स्टाईन प्रीस्कूल मध्ये आहे. मतदान केंद्र बदलून जवळचे देण्याची विनंती त्याचे वडील नीरज कुमार सिन्हा यांनी केली. मात्र ही मागणी करताना उशीर झालेला असल्यामुळे त्याला आहे त्याच मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आणण्याची सर्व व्यवस्था करण्याच्या विशेष सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या. त्यानुसार त्याचे मतदान करवून घेण्यात आले.

मतदानानंतर नीरज कुमार सिन्हा यांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच निवडणूक प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.

नीरज कुमार सिन्हा: मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वाहन व प्रतिनिधी तसेच सहायक पाठवून माझा मुलगा नितीन याला त्याच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची व्यवस्था केली. मतदानानंतर नचिकेतच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.