Pune District Administration | जिल्हा प्रशासनातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ केंद्र स्थापन | पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात

HomeBreaking Newsपुणे

Pune District Administration | जिल्हा प्रशासनातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ केंद्र स्थापन | पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात

गणेश मुळे Jul 27, 2024 1:31 PM

Pune Loksabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
Voting Awareness | जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका सहित सर्वांनी  मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता सामुहिक प्रयत्न करावे |  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Voter List | मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक | नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत | जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

Pune District Administration | जिल्हा प्रशासनातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १२ केंद्र स्थापन | पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात

 

Pune News – (The karbhari News Service) –  गुरुवारी पुणे शहर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांची कागदपत्रे वाहून गेली असल्याने त्यांना नवीन कागदपत्रे तयार करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे १२ ठिकाणी मदत केंद्राची स्थापना करण्यात आला आहे. (Pune Rain News)

पुरामुळे काही नागरिकांचे आधारकार्ड, विविध प्रकारचे दाखले आदी कागदपत्रे खराब झाली किंवा पुराच्या पाण्यात वाहून गेली. अशा नागरिकांना या विशेष केंद्राद्वारे त्वरीत दाखले तयार करून देण्यात येणार आहेत. नागरिकांकडून माहिती घेवून हे दाखले तयार करण्यात येतील. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे.

डॉ.राजेंद्र प्रसाद शाळा बोपोडी, कॅन्टोन्मेंट कार्यालय खडकी, महात्मा ज्योतिबा फुले शाळा ताडीवाला रोड, परुळेकर शाळा येरवडा, बुद्ध विहार समाज मंदिर मंगळवार पेठ, बारणे शाळा मंगळवार पेठ, कलमाडी शाळा मंगळवार पेठ, अनुसूयाबाई खिल्लारे शाळा एरंडवणे, आंबेडकर शाळा पाटील इस्टेट, तपोधाम सोसायटी वारजे, एकतानगर वडगाव बुद्रुक, इंदिरा नगर उत्तम नगर, वडगाव शेरी, याठिकाणी नागरिकांना नवीन कागदपत्रे देण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येईल आणि जागेवरच आवश्यक दाखले देण्यात येतील.

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात
पुराचे पाणी घरात शिरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे दिवसभर सुरू होते. त्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरात २ हजार ५००, पुणे शहरात २ हजार २०० आणि हवेली तालुक्यात ९०० पंचनामे असे एकूण ५ हजार ६०० पंचनामे पूर्ण करण्यात आले. रविवारी सकाळपर्यंत उर्वरीत पंचनाम्याचे काम पूर्ण करून शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील धोकदायक पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत बंदी
जिल्ह्यातील काही भागात अजूनही पाऊस सुरू असल्याने आणि शनिवारी नारंगी तसेच पुढील दिवसात पिवळा इशारा असल्याने पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर बंदी राहील असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी पुणे-नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यांना दैंनंदिन कामात अडचण होऊ नये यासाठी तात्काळ आवश्यक दाखले देण्यासाठी स्वतंत्र मदत केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. पूरग्रस्तांना सर्व सुविधा देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून रविवार सकाळपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.