Pune Corporation Encroachment Action | पुणे महापालिकेची पाषाण परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडले

Homeपुणेsocial

Pune Corporation Encroachment Action | पुणे महापालिकेची पाषाण परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडले

गणेश मुळे Mar 01, 2024 2:25 PM

PMC Encroachment/illegal construction removal Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाकडून शहराच्या विविध भागात जोरदार अतिक्रमण कारवाई!
Pune Municipal Corporation Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाच्या शर्यतीत आता उरले दोनच अधिकारी! | दोघांनी घेतली माघार!
PMC Illegal Construction Action | बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप मधील अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची कारवाई 

Pune Corporation Encroachment Action | पुणे महापालिकेची पाषाण परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडले

 

Pune – (The Karbhari Online) – पाषाण मुंबई पुणे महामार्ग वरील विनापरवाना शो रूम, फर्निचर मॉल इ वर बांधकाम विकास विभागाचे वतीने आज पुन्हा जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.

यापूर्वी या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्या नंतर काही दुकानदारांनी मे उच्च न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती आदेश मिळवले होते. मात्र 23 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने स्थगिती आदेश उठवले . या नंतर स्थानिक बंदोबस्त मिळवून आज कारवाई करण्यात आली. स्थगिती आदेश नंतर 6 दुकानदार मे. सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्या मध्ये आज स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता असल्याने सकाळी लवकर कारवाई सुरू करण्यात आली.

6 पैकी 5 दुकानदारांवर या पूर्वी कारवाई करण्यात आली होती. ज्या दुकानदारावर कारवाई झाली नव्हती त्याचेवर प्रथम कारवाई करण्यात आली. 6 दुकानदारां बाबत मे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले. तोपर्यंत कारवाई झाली होती. आज 20 दुकानावर कारवाई करून सुमारे 3 लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.

The karbhari - pune corporation encroachment

सदर बांधकाम हे HEMRL या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या फर्निचर मॉल मुळे highway वर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पुढील आठवडय़ात समोरील बाजू कडील दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे. चतुःशृंगी पोलीस ठाणे चा स्थानिक बंदोबस्त प्राप्त करून कारवाई करण्यात येईल. तसेच कीर्ती गार्डन येथील फार्म हाऊस वरही कारवाई करण्यात येणार आहे असे उप अभियंता सुनील कदम यांनी सांगितले.

यावेळी jwa कटर मशीन, दोन jcb, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

हिंजवडी पोलीस स्टेशन चीफ वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ईतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

सदर कारवाई अधीक्षक राजेश बनकर , कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ, यांनी पूर्ण केली