Pune Congress | पुणे महापालिका निवडणूक | पुणे कॉंग्रेस इच्छुकांना मंगळवार पासून देणार अर्ज 

HomeBreaking News

Pune Congress | पुणे महापालिका निवडणूक | पुणे कॉंग्रेस इच्छुकांना मंगळवार पासून देणार अर्ज 

Ganesh Kumar Mule Dec 06, 2025 8:19 PM

PMC Election Draft Voter List 2025 | ४१  प्रभागांत ३५  लाख ५१ हजार ४६९ मतदार | प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
PMC Ward 11 – Rambaugh Colony Shivtirthnagar | प्रभाग क्रमांक ११ – रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर   –  प्रभागाची व्याप्ती आणि सविस्तर माहिती जाणून घ्या
PMC Election Voter List | मतदार यादीतील दुबार नावे वगळा | अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू

Pune Congress | पुणे महापालिका निवडणूक | पुणे कॉंग्रेस इच्छुकांना मंगळवार पासून देणार अर्ज

 

Pune Congress on PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मंगळवार ९ डिसेंबर पासून देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. (Pune News)

मंगळवार  ९ डिसेंबर  ते शनिवार १३ डिसेंबर  या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन व भरून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे ५ येथे सकाळी ११.०० ते सायं. ५.०० या कालावधीत जमा करावेत. अशी माहिती या पत्रकाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: