Pune Congress | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’|  मोहन जोशी   – पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती – रवींद्र धंगेकर

HomeBreaking Newsपुणे

Pune Congress | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’|  मोहन जोशी – पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती – रवींद्र धंगेकर

गणेश मुळे May 09, 2024 2:16 PM

MLA Sunil Kamble | NCP Pune | आमदार सुनिल कांबळे यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून पुण्यात आंदोलन
Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी 
Pune BJP New Office |  शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू | देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विविध नेत्यांकडून शुभेच्छा 

Pune Congress | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’|  मोहन जोशी

 

Pune Congress – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (Pune Loksabha Constituency) भारतीय जनता पक्षाने (BJP Pune_ प्रकाशित केलेले संकल्पपत्र हे भाजप परंपरेतील फसवणूक पत्रच आहे असे स्पष्ट दिसून येते. कारण गेली १० वर्षे केंद्रात व राज्यात भाजप सत्तेवर आहे. तसेच पुण्यात भाजपचे  महानगरपालिकेत १०० नगरसेवक६ आमदार आणि १ खासदार असूनही पुण्याचा विकास ठप्प झालास्मार्ट सिटी योजना फसलीमेट्रो प्रकल्प किलोमीटरऐवजी इंच-इंचाने पुढे सरकत आहेनदी सुधार प्रकल्पात प्रगती शून्य आहेट्रॅफिक समस्या अधिक जटिल झाली आहे. हे व असे अनेक प्रश्न सत्ता असूनही भाजपने सोडवले नाही आणि या नव्या संकल्पपत्रात मात्र ‘काय करणार’ याची जंत्री दिली आहे. पुणेकरांचा त्यामुळेच भाजपाच्या या संकल्पपत्रावर विश्वास बसणार नाही हे निश्चित. असा दावा माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे. 

 

काँग्रेस पक्षाने पुण्याचा सर्वांगीण चौफेर विकास केला, नव्या चांगल्या रोजगारांच्या संधी निर्माण केल्या. असे काहीही भाजपने संधी असूनही केले नाही. कारण पुण्याचा विकास करण्याची क्षमता, जिद्द, दूरदृष्टी आणि धमक त्यांच्यात नाही. त्यामुळेच भाजपचे आताचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’ आहे. असेही जोशी म्हणाले. 


पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती – रवींद्र धंगेकर

 

पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती आली आहे, असा विश्वास महाविकास आघाडी, इंडिया आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

 

यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात धंगेकर यांनी म्हटले आहे की, पूर्णपणे सक्रिय झालेली महाविकास आघाडीची यंत्रणामित्रपक्षांकडून मनापासून मिळणारे सहकार्य आणि नागरिकांच्या सर्वच स्तरांतील घटकांतून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातील लोकसभेची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती आली आहे.

 

महाविकास आघाडीने या निवडणुकीत पहिल्यापासूनच उत्तम यंत्रणा कामाला लावली. राष्ट्रीय व राज्यपातळीवरील अनेक नेते पुण्यात प्रचाराला येत आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदा आणि मित्रपक्ष, तसेच विविध संघटनांचे नेते नियमितपणे पत्रकार परिषदा घेऊन महाविकास आघाडीची बाजू प्रसारमाध्यमांमध्ये जोरकसपणे मांडत आहेत. त्याचेही विधायक पडसाद आम्हाला जाणवत आहेत. महापालिका, तसेच विधानसभास्तरावर मी स्वतः केलेले काम आणि नागरिकांच्या प्रश्नावर उठवलेला आवाज याची पावती ठिकठिकाणी लोकांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीच्या पारंपरिक मतांमध्ये यंदा मोठी वाढ होत असल्याचे दिसत असून, भाजपच्या राजवटीला कंटाळलेला मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय मतदारही मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे वळत असल्याचे पुण्यातील चित्र आहे. गरीब आणि कष्टकरी जनतेच्या हालाकीत जी भीषण वाढ झाली आहे, त्यामुळे या वर्गात यंदा ‘अच्छे दिन’च्या थापा मारणारे मोदी सरकार अजिबात नको, अशी भावना निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात लोकांची फसवणूकच केली. पेट्रोलडिझेलगॅस आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची महागाई यामुळे मध्यमवर्गीय त्रस्त झाला आहे. तसेच वाढलेला औषधोपचारांचा खर्चशिक्षण खर्च आणि जीएसटीसारखे लादण्यात आलेले कर यामुळे सामान्य नागरिक पिचून गेला आहे. मोदी सरकारच्या राजवटीत मणिपूरमध्ये झालेला हिंसाचारइलेक्टोरल बॉण्ड  घोटाळापीएम केअर फंड घोटाळानोटाबंदीच्या काळात झालेले गैरव्यवहार या सगळ्या गैरप्रकारांची पुणेकरांना चांगलीच माहिती असल्याचे प्रचारकाळात दिसून येत आहे. त्यावर नागरिक तीव्र संतापही व्यक्त करीत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने या राजवटीला वैतागलेला पुणेकर स्वयंस्फूर्तीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आम्हाला अत्यंत सोपी झाली आहे, असेही धंगेकर यांनी म्हटले आहे.