Pune Congress Agitation | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधीत  चिखलफेको आंदोलन 

HomeBreaking Newsपुणे

Pune Congress Agitation | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधीत  चिखलफेको आंदोलन 

गणेश मुळे Jun 21, 2024 2:24 PM

PMC pune | Transfers | महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या! |  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत 
Congress | Pune | मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | पुणे काँग्रेसची टीका
Departmental Examination | PMC Pune | लेखनिकी संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षचे तिन्ही पेपर लेखी घेण्यात यावे

Pune Congress Agitation | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधीत  चिखलफेको आंदोलन

 

Congress Vs Mahayuti – (The Karbhari News Service) – महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते बियाणांचा काळा बाजार, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधी  भाजपा महायुती सरकारच्या निषेधार्थ चिखल फेको आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरीकष्टकरीदलितअल्पसंख्याकमहिलातरूणगरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजराजर्षी शाहू महाराजमहात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीतह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागतेशेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदाकापूससोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाहीसरकार एमएसपी देत नाही. कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे. NEET परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या सरकारने धोक्यात आणले आहे. पब संस्कृती व ड्रग्जचे तरूणांमध्ये वाढते प्रमाण, महागाईबेरोजगारीपेपरफुटीहिला सुरक्षाखतेबि-बियाणांचा काळाबाजारकर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूकचिखलात सुरु असलेली पोलीस भरतीराज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, श्रीमंताची मुले नशेमध्ये धुंद होऊन दिवसाढवळ्या गोरगरीब जनतेला गाडीखाली चिरडत आहे, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही हे ‘चिखल फेको’ आंदोलन करीत आहोत.’’

यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सह मा गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, आमदार रविंद्र धंगेकर, मा मंत्री बाळासाहेब शिवरकर, मा महापौर कमलताई व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयज छाजेड, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय बालगुडे,मा गटनेते आबा बागुल, मा नगरसेवक अजित दरेकर, मा नगरसेवक चंदुशेठ कदम, मा नगरसेवक रफिक शेख, मा नगरसेविका लताताई राजगुरू, मा नगरसेविका सुजाताताई शेट्टी, मा नगरसेवक कैलास गायकवाड,अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, ओ बी सी सेलचे प्रदेश पदाधिकारी साहिल केदारी, ओ बी सी सेलचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, पुणे शहर उपाध्यक्ष सतिश पवार, ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने,राजु ठोंबरे, रविंद्र माझिरे, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, दिलीप तुपे, पुणे शहर सरचिटणीस उषाताई राजगुरू, सुंदरताई ओव्हाळ,रवी आरडे, मतीन शेख, रवी ननावरे, वाल्मिकी जगताप,नुर शेख, बाबा सय्यद, रॉबर्ट डेव्हिड, द स पोळेकर, सुरेश नांगरे, अनिल पवार, अविनाश अडसूळ, सुनील काळोखे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.