Pune CCTV project | पुणे शहरात सीसीटीव्ही बसवताना खोदाई शुल्क माफ करण्याची पुणे पोलिसांची मागणी
| पुणे महापालिकेकडून मात्र कसलाही प्रतिसाद नाही
Pune CCTV project | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून (Pune Police commissionerate) पुणे शहर सीसीटीव्ही फेज-२ प्रकल्पाच्या (Pune city CCTV phase 2) कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम करताना खोदाई आवश्यक असते. मात्र यासाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) खोदाई शुल्क (Trenching Fee) आकारले जाते. हे शुल्क माफ करण्याबाबत पुणे पोलिसांनी (Pune Police) महापालिकेला राज्य सरकारच्या आदेशाचा हवाला देत खोदाई शुल्क माफ करण्याबाबत पत्र दिले होते. मात्र महापालिकेकडून याबाबत कुठलाही प्रतिसाद पुणे पोलिसांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालयाने पुन्हा एकदा पत्र पाठवत खोदाई शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे. (Pune CCTV project)
पुणे पोलिसांच्या (Pune police) पत्रानुसार , पोलीस आयुक्त, पुणे शहर हद्दीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा (CCTV in Pune) वाढवणे व नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याने सध्याच्या सीसीटीव्ही कार्यान्वीत प्रकल्पामध्ये वाढ करावयाची आहे. त्यासाठी पुणे शहर हद्दीमध्ये विविध ठिकाणी खोदकाम, पुर्नस्थापीत करणे इ. कामे करणे करीता पुणे महानगर पालिकेकडून (PMC Pune) तसेच पुणे व खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाकडून (Khadaki Cantonment Board) विविध शुक्लाची आकारणी येते. यापूर्वी सन २०१३ मध्ये महाराष्ट्र शासन गृह (Home ministre Maharashtra) विभागाने महापालिकेस विविध कामाकरीता आकारण्यात येणारे कोणतेही शुल्क अलाईड डिजीटल सर्व्हिसेस लि. मुंबई यांचे कडून अकारणी करणेत येवू नसे असा प्रस्ताव आपले कायर्पलयास पाठविणेत आला होता. त्याअनुषंगाने महापालिकेकडून कोणतेही शुल्क आकारणेत आलेले नव्हते. (Pune CCTV news)