पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला त्यांच्या हिस्स्याचे जीएसटी चे पैसे मिळावेत |आमदार सुनील कांबळे यांची विधान सभेत मागणी
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला त्यांच्या हिस्स्याचे जीएसटी चे पैसे मिळावे, अशी मागणी लक्षविधी द्वारे आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभा सभागृहात केली.
लक्षवेधीवर सभागृहात बोलताना कांबळे म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 P च्या कलम (ई) तरतुदीनुसार कॅन्टोन्मेंट बोर्ड हे नगरपालिका असल्याचे मानले जाते; परंतु राज्य सरकारने वस्तू व सेवा कर कायदा 2017 च्या कलम 2(69 ) अंतर्गत स्थानिक प्राधिकरण म्हणून काँटोन्मेंट बोर्डाचा समावेश होतो; परंतु शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये 27 स्थानिक प्राधिकरणाचा समावेश केलेला आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश त्यामध्ये नाही. 2017 च्या वस्तू आणि सेवा कर कायद्यामध्ये राज्यातील 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड चा समावेश करण्यासाठी कॅबिनेट बैठक घेऊन कायद्यामध्ये दुरुस्ती करून राज्यातील या सात कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश करावा, तसेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये जवळजवळ 3500 कमर्शियल आस्थापना असून त्यांच्यापासून केंद्र सरकार जीएसटी गोळा करीत आहे. राज्याचा हिस्सा म्हणून केंद्र सरकार काँटोन्मेंट बोर्डाचे पैसे सुद्धा राज्य सरकारकडे जमा करीत आहे. परंतु गेल्या पाच वर्षापासून एकही पैसा त्यांच्या वाट्याचा मिळालेला नाही. तेव्हा राज्य शासनाकडे केंद्र सरकारकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विषयाचे जीएसटीचे जे पैसे आलेले आहेत ते कॅन्टोन्मेंट बोर्डाला वितरित करावे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कडे जीएसटी चे पैसे न आल्यामुळे बोर्डाची आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची झालेली आहे. बोर्डाच्या हद्दीतील रस्ते पाणीपुरवठा योजना किंवा अन्य विकास कामे पूर्णपणे रखडलेली आहेत. शासन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला जास्तीत जास्त निधी देऊन तेथील विकास कामे मार्गी लावावीत अशी मागणी आमदार सुनील कांबळे यांनी केली