Pune Book Festival | पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम | पुणे पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम

HomeBooks

Pune Book Festival | पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम | पुणे पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम

Ganesh Kumar Mule Dec 21, 2024 8:56 PM

Sahitya Ratna Annabhau Sathe Scholarship | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
PMC Solid Waste Management Department | सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे पुणेकरांना अजून पडणार महागात! | पुणे महापालिका अडीच ते तीन पटीने दंड वाढवणार
Employment | यशवंतराव चव्हाण सेंटर देणार मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार

Pune Book Festival | पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम | पुणे पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम

 

Pune Pustak Mahotsav – (The karbhari News Service) – पुणे पुस्तक महोत्सवात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम शनिवारी करण्यात आला आहे. या विक्रमासाठी तब्बल ९७ हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम झाला आहे. या विक्रमाच्या निमित्ताने आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून, आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संयोजन समितीचे सदस्य प्रविण तरडे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, डॉ. संजय चाकणे, मंदार जोशी, मिलिंद कांबळे, सुनील भंडगे, स्वामिराज भिसे आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विक्रम करण्यात आला आहे. या विक्रमाच्या निमित्ताने संविधानाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केले आहे. या विक्रमासाठी अविरतपणे काम केलेल्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो, अशी माहिती पांडे यांनी दिली.
पुस्तकांपासून तयार केलेले संविधानाचे हे सर्वात मोठे शिल्प आहे. त्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. हे शिल्प साधारण १० मीटरचे आहे. त्यासाठी ९७ हजार २० पुस्तके वापरण्यात आली. साधारण ८० स्वयंसेवक आठ दिवसांपासून हा विक्रम होण्यासाठी कार्यरत होते, असे राहुल पाखरे यांनी सांगितले. या शिल्पाच्या आरखड्यासाठी पूजा मुंडे आणि स्वरूप कुलकर्णी यांनी मेहनत घेतली.
….
जागतिक विक्रम पाहण्याची शेवटची संधी

पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती पाहण्याची आज रविवारी २२ डिसेंबरला शेवटची संधी आहे. महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांना सकाळी १० ते रात्री १० या वेळेत विक्रमाचे शिल्प पाहता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी पुणे महोत्सवाला भेट देऊन, पुस्तके खरेदी करावी आणि संविधानाचे शिल्प पाहावे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले.
——-
पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देण्याची  शेवटची संधी
…..
पुणे पुस्तक महोत्सवात शनिवारी हजारो पुणेकरांनी भेट देऊन मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी केली आहे. या पुस्तक महोत्सवात २२ भारतीय भाषांमधील विविध विषयांवरील १२ लाख पुस्तके उपलब्ध आहेत. मुलांसाठी कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव अशी मेजवानी आहे. पुणे पुस्तक महोत्सवात शनिवारी संविधानाचे भव्य शिल्प साकारून विश्वविक्रम करण्यात आला आहे. रविवारी २२ डिसेंबरला पुणे पुस्तक महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पुणेकरांनी सहकुटुंब महोत्सवाला सकाळी १० ते रात्री १० या वेळेत भेट देऊन वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी पुस्तक खरेदीचा आनंद घ्यावा. त्यासोबतच संविधानाच्या शिल्पाला भेट द्यावी, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
——-

मी पहिल्यांदाच पुणे पुस्तक महोत्सवात पुस्तक वाचनाच्या निमित्ताने आले आहे. माझे जीवन संघर्षमय असल्याने, मला जीवनात पुस्तक वाचनची संधी कधीच मिळाली नाही. अनेक ठिकाणी प्रवास करताना मला मोकळा वेळ मिळतो. त्या वेळेचा मी पुस्तक वाचनासाठी नक्कीच सदुपयोग करीन. आज मला संधी पुस्तक वाचन मिळालेली आहे. पुस्तक वाचन मध्ये सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तके मी वाचन करणार आहे.सर्वांनी पुस्तक महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी. पुणे पुस्तक महोत्सवाला भरपूर शुभेच्छा.

गौतमी पाटील, प्रसिद्ध नृत्यांगना

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0