IGBC | PMC | हरित विकासासाठी आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे ठरले महाराष्ट्रातील पहिले शहर

HomeBreaking Newsपुणे

IGBC | PMC | हरित विकासासाठी आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे ठरले महाराष्ट्रातील पहिले शहर

Ganesh Kumar Mule Apr 14, 2023 2:19 AM

MLA Sunil Kamble |  अपात्र ठेकेदारांना पात्र तर पात्र ठेकेदारांना अपात्र ठरवणाऱ्या मनपा प्रशासनाची चौकशी व्हावी | आमदार सुनील कांबळे विधानसभेत आक्रमक
BJP’s Ghar Ghar Chalo Sampark | भाजपचे पुण्यातही  घर चलो संपर्क अभियान
Vidhansabha Election Voting | पुणे शहर आणि जिल्ह्यात दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क | फोटो पहा. 

हरित विकासासाठी आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे ठरले महाराष्ट्रातील पहिले शहर 

 इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (आयजीबीसी) ग्रीन एक्झिस्टिंग सिटीज रेटिंग सिस्टम अंतर्गत हरित विकासासाठी दिला जाणारे प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिलेतर भारतातील दुसरे शहर बनले आहे. यापूर्वी गुजरातमधील राजकोट शहरास हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजइंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित अभिनंदन – ग्रीन पायोनियर्सचा सत्कार‘ या कार्यक्रमात मा. महापालिका आयुक्त श्री विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते प्लॅटिनम प्रमाणपत्र स्वीकारले. शहराच्या हरित विकासासाठी पाठिंबा देणाऱ्या क्रेडाई पुणे मेट्रो संघटनेलाही यावेळी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

याप्रसंगी यशदाचे महासंचालक एस चोकलिंगमसीआयआय-आयजीबीसीचे उपकार्यकारी संचालक एम आनंदग्रीन फॅक्टरी रेटिंग सिस्टमचे अध्यक्ष प्रदीप भार्गवआयजीबीसी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष जेपी श्रॉफसह-अध्यक्ष पूर्वा केसकरमुख्य समिती सदस्या प्रणती श्रॉफक्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरेमहासंचालक डॉ. डी के अभ्यंकर उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या हवेची गुणवत्ता सुधारणेशहरी हरित पट्टा विकास,  मृदा संवर्धनजलाशयांचे जतनपाण्याची उपलब्धतापर्यावरण संवर्धनघनकचरा व्यवस्थापन  यासह इतर विविध उपक्रमांचा अभ्यास यासाठी करण्यात आला होता.  प्रकल्पाची अंमलबजावणी आणि  त्याची शाश्वतता या संदर्भातील सर्वंकष अभ्यासानंतर महापालिकेला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.    पुणे महानगरपालिका , क्रेडाई पुणे मेट्रो आणि आयजीबीसी ,पुणे  यांनी दोन वर्षे एकत्रपणे काम करून प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ” हरित विकासासाठी मिळालेले हे प्रमाणपत्र म्हणजे पुणे महापालिकेच्या चांगल्या कामगिरीचे द्योतक आहे. पर्यावरणासाठी गेल्या काही वर्षात पुणे महापालिकेने अतिशय चांगले उपक्रम राबविले आहेत जसे की  शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल, कार्बन इन्वेंटरी, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने विकेंद्रित व्यवस्था, भूजल नोंदणी ई. रेन वाटर हारवेस्टींग, गांडूळ-खत प्रकल्पसौर उर्जायासाठी उचललेल्या पावलांवर १५ टक्के पर्येंत सूट देणारे पुणे हे पहिले शहर आहे. एकूणच पर्यावरण या विषयाची गांभीर्याने दखल घेतमहापालिका पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र त्याचवेळी हवामान बदल हे शहरासमोरचे सर्वात मोठे आव्हान असूनआपले पर्यावरण आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार म्हणाले, ” गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर हे सर्वात राहण्यायोग्य शहर ठरत आहे. हे शहर कायमच सर्वात राहण्यायोग्य शहर राहीलयासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. शहरात विविध पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. ही उभारणी करताना तसेच ती केल्यानंतरही पर्यावरण संवर्धनसाठी अधिक प्राधान्य दिले जाते. पर्यावरण संवर्धन आणि विकास यांमध्ये योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न महापालिकेकडून नेहमी केला जातो. आगामी काळात देखील पुणे महानगरपालिका आणि आमचे सर्व अधिकारीकर्मचारी हे सर्वात जास्त राहण्यायोग्य शहर‘ हा टॅग पुण्याकडेच राहील यादृष्टीने काम करत राहणार,” असे यांनी सांगितले.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले की “क्रेडाई पुणे मेट्रो हो संघटना हरित विकासाला नेहमीच पाठिंबा देते. ही हरित विकासाची चळवळ शाश्वत राहावीयासाठी शहरातील विकसक हे सर्वसमावेशक रीतीने या चळवळीत योगदान देतीलअशी मी यावेळी ग्वाही देतो. मला खात्री आहेकी  महाराष्ट्रातील प्रत्येक शहरप्रत्येक तहसील आणि प्रत्येक जिल्हा या हरित विकासाचे अनुकरण करेल आणि पुढील १० ते १५ वर्षांत राज्यातील प्रत्येक शहरजिल्हागावे ही आयजीबीसीतर्फे प्रमाणित केली जातील. या हरित चळवळीला काही प्रमाणात आर्थिक नफ्याची जोड दिल्यासही चळवळ अधिक बळकट होऊ शकतेयासाठी ग्रीन इन्सेंटिव्ह योजना सुरू करता येतील कायाबाबत प्रशासनाने आणखी प्रयत्न करावे.”

कार्यक्रमात हरित विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विलास जावडेकर डेव्हलपर्सगंगोत्री होम्सअमर बिल्डर्सकोहिनूर ग्रुप आणि मालपाणी ग्रुप यांचा वंदना चव्हाण आणि विक्रम कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.