Pune Balsnehi Chowk |प्रभाग २ मधील बालस्नेही चौकाचे लोकार्पण | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पाठपुरावा

HomeBreaking Newsपुणे

Pune Balsnehi Chowk |प्रभाग २ मधील बालस्नेही चौकाचे लोकार्पण | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पाठपुरावा

गणेश मुळे Feb 21, 2024 3:37 AM

Mukhyamantri Majhi Ladki Bahin | चुकीच्या आमिषाला बळी न पडता लाडकी बहन योजनेचा लाभ घ्या : डॉ. सिद्धार्थ धेंडे
Jagdish Mulik | नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार
Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू

Pune Balsnehi Chowk |प्रभाग २ मधील बालस्नेही चौकाचे लोकार्पण | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पाठपुरावा

| ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांच्या सुरक्षेची घेतली जबाबदारी

| माजी आमदार जगदीश मुळीक, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत पाटील यांची उपस्थिती

 

Pune Balsnehi Chowk | पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील समतानगर येथील लुंबिनी उद्यानासमोरील बालस्नेही चौकाचे लोकार्पण करण्यात आले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर माजी आमदार जगदीश मुळीक, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला, लहान मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे. (Dr Siddharth Dhende Pune)

या वेळी येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, नाना नलावडे, मंगेश गोळे, नामदेवराव घाडगे, यशवंत शिर्के,पांडाभाउ मोहीते , विजय कांबळे, गजानन जागडे, शेखर शेंडे, दिलिप मस्के ,शिवाजीराव ठोंबरे आदीसह प्रभाग दोन मधील रिक्षा संघटनांचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

The karbhari - Dr Siddharth Dhende

प्रभाग दोन येथील समतानगर मधील लुंबिनी चौकात भाजी मंडई, शाळा, पीएमपीएल बस थांबा असल्याने लोकांची मोठी वर्दळ असते. अनेक वेळेला या चौकातून वाहनधारक वेगाने वाहने चालवीत जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. एखादा अपघात घडण्याची भीती नागरिकांमध्ये होती. त्यावर अंकुश बसावा, तसेच खबरदारी म्हणून प्रभागातील नागरिकांनी उपाययोजना राबविण्याबाबत माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. चौक सुरक्षित होण्यासाठी तसेच त्याच्या सुशोभीकरणासाठी डॉ. धेंडे यांनी पुणे महापालिकेकडे तसेच अर्बन ९५ अंतर्गत काम करण्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले. महापालिकेने येथील बालस्नेही चौकाचे डिझाईन करून हा चौक सुरक्षित करण्याबरोबरच सुशोभित देखील केला आहे. त्याचे सोमवारी (दि. १९) माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे वाहतूक शाखेचे डीसीपी शशिकांत बोराटे यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडले.

The karbhari - Jagdish Mulik

बालस्नेही चौक (मुलांसाठी सुरक्षित चौक) हा शहरातील १०० चौकापैकी एक महत्त्वाचा पहिला आगळावेळा उपक्रम ठरला असल्याचे यावेळी वाहतूक शाखेचे डीसीपी शशिकांत बोराटे आणि माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले.
—————-
बालस्नेही चौकात मिळणार या सुविधा –

या चौकामध्ये विविध उपाय योजनांचा समावेश केला आहे. त्यामध्ये चौकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. गतिरोधक बसवण्यात आले आहेत. लहान मुलांना रस्ता ओलांडता यावा यासाठी रस्ता क्रॉसिंगची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी असणाऱ्या रिक्षा स्टॅन्डचे डिजिटलायझेशन केले आहे. त्यामध्ये एलईडी बसवून प्रभागाची तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिसणार आहे. याचा लाभ प्रभागातील नागरिकांना होणार आहे. बस, शाळेचे वेळापत्रक त्या फलकावर दिसणार आहे. आपत्कालीन सेवा बजावणारे सर्व संपर्क क्रमांक देखील दिसणार आहेत. पुणे शहरातील हे पहिले डिजिटल रिक्षा स्टॅन्ड ठरले आहे.
———-

प्रभाग क्रमांक दोन मधील समतानगर येथील लुंबिनी उद्यानाजवळील हा मुख्य चौक असल्यामुळे नागरिकांची सतत मोठी वर्दळ असते. काही वाहन चालक वेगाने वाहने चालवीत असल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले होते. त्यानुसार पुणे महापालिका आणि अर्बन ९५ अंतर्गत मी बालस्नेही चौकाचे सुशोभीकरण करत सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली. महापालिकेचे अधिकारी, प्रभागातील नागरिकांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला. पुणे शहरातील अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम असल्याचे मी मानतो.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
—————————————-