Pune Airport Sanitation | पुणे एअरपोर्टच्या आसपासचा परिसर महापालिका करणार चकाचक  | घनकचरा विभागाकडून नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती 

Homeadministrative

Pune Airport Sanitation | पुणे एअरपोर्टच्या आसपासचा परिसर महापालिका करणार चकाचक  | घनकचरा विभागाकडून नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती 

Ganesh Kumar Mule Jun 27, 2025 10:04 PM

Road ‘Safety’ | Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम
MLA Hemant Rasane | कचऱ्याची जागा घेत आहेत वारसा सांगणाऱ्या शिल्पकृती | आमदार हेमंत रासने यांचे ‘मिशन १०० दिवस’ सुरू
Pune Municipal Corporation Lokshahi Din| पुणे महापालिकेत ५ जुन रोजी लोकशाही दिनाचे आयोजन | नागरिकांसाठी हे आहे महापालिकेचे आवाहन!

Pune Airport Sanitation | पुणे एअरपोर्टच्या आसपासचा परिसर महापालिका करणार चकाचक  | घनकचरा विभागाकडून नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

 

PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – पुणे शहराचा प्रवेश असलेला व महत्वाचा संपूर्ण एअरपोर्ट रोडवर 24X7 स्वच्छता असणे आवश्यक आहे. याबाबत अनेक पदाधिकारी व वरीष्ठांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भागातील अस्वच्छतेमुळे त्याठीकाणी मोठ्या प्रमाणात प्राणी व पक्ष्यांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे विमान उड्डाणास अडचण होत असलेबाबत एअरपोर्ट ॲथोरिटी यांनी कळविले आहे. त्यनुसार एअरपोर्ट परिसरच्या ४ किलोमीटर चारही बाजूचा परिसरात स्वच्छता राखली जाईल या अनुषंगाने तीन पाळीमध्ये कामकाज सुरु ठेवणेसाठी तुळशीराम साबळे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Sandip Kadam PMC)

तसेच तीन पाळीतील कामकाजासाठी खालीलप्रमाणे  आरोग्य निरीक्षक/ अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.

संदेश रोडे, नगर रोड स.६.०० ते दु.२.००

पराग राऊत येरवडा – कळस धानोरी दु. २.०० ते रा. १०.००

सचिन निकाळजे ढोले पाटील रोड रा. १०.०० ते स. ६.००

वरीलप्रमाणे नियुक्त अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावयाचे आहे.

1. पुणे एअरपोर्ट पासून ५०९ चौक ते नागपूर चाळ, कलवड वस्ती आजूबाजूचा ४ किलोमीटरचा परिसर एअरपोर्ट ते नगररोड पर्यत चा रस्ता या संपूर्ण परिसरात सार्वजनिक स्वच्छता राखली जाईल याची दक्षता घेणे.
2. या संपूर्ण VIP रोडवर कोठेही क्रॉनिक स्पॉट दिसणार नाहीत, तसेच ओपन प्लॉट क्षेत्रीय कार्यालय च्या मदतीने बंदिस्त करून त्याठिकाणी स्वच्छता कायम ठेवणे, या भागात दैनंदिन स्वरूपात डीप क्लिनिंग संबधित क्षेत्रीय कार्यालयाच्या मदतीने करून घेणे कामकाज करून घेणे.
3. याकामासाठी आवश्यक सफाई सेवक, घंटागाडी व इतर संबंधीत क्षेत्रिय कार्यालयामार्फत उपलब्ध करून घेऊन तीन पाळ्यांमध्ये सफाई सेवकांची नियुक्ती करणे.
4. वरील सेवकांनी अठवड्यातील सातही दिवस कामकाज करावयाचे आहे. सदर सेवकांनी आठवड्यातून एक दिवस रजा घ्यावाची आहे व सहाय्यक आयुक्त नगर रोड क्षेत्रीय कार्यालय यांनी बदली सेवक द्यावयाचे आहे.
वरीलप्रमाणे नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी आपले करून दिलेले कामकाज पुढील आदेश होईपर्यंत करावयाचे आहे. तसेच या संपूर्ण VIP रस्त्यावरील दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबधित नगररोड क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त यांचे मार्फत दैनंदिन स्वरुपात  उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांचेकडे सादर करावयाचा आहे.