Pune Airport Runway Expansion | पुणे विमानतळच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करा | उज्ज्वल केसकर यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी 

Pune Airport Runway

HomeBreaking News

Pune Airport Runway Expansion | पुणे विमानतळच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करा | उज्ज्वल केसकर यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Aug 27, 2024 4:11 PM

Standing Committee : २ हजार कोटी पेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना स्थायीची मान्यता!  : ‘हम वादे नही इरादे लेकर आये है’
Pune Airport New Terminal | मोहोळजी, प्रसिद्धी नको विमान प्रवाशांना सुविधा द्या | माजी आमदार मोहन जोशी
Merged villages : Murlidha Mohol : समाविष्ट गावांतील साडेतीनशे कोटींच्या प्रकल्पाला उद्यापासून सुरुवात!

Pune Airport Runway Expansion | पुणे विमानतळच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करा | उज्ज्वल केसकर यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी

 

Pune Airport Runway – (The Karbhari News Service) – पुणे विमानतळा च्या  धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी जर 160 कोटी रुपये अथवा टीडीआर इंडेक्स बदलण्याचा निर्णय घेऊन काम होणार असेल तर  याबाबत पुढाकार घेऊन पुण्याच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करा. तसेच पुण्यातील औद्योगिक आयटीबीटी क्षेत्रातील वाढीसाठी ही एक सुलभ वाहतूक व्यवस्था करण्या साठी आपण पुढाकार घ्यावा. अशी मागणी उज्ज्वल केसकर (Ujwal Keskar) यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol)  यांच्याकडे केली आहे. (Pune Airport Runway Expand)

 

केसकर यांच्या निवेदनानुसार  पुणे विमानतळ लष्करी विमानतळ आहे. प्रादेशिक योजनेच्या अहवालात (Regional Plan Report) मध्ये 1992 साली खेड येथे विमानतळ करण्याची सूचना केली होती. मात्र या विमानतळाला विरोध झाल्यामुळे प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये नवी मुंबई येथे विमानतळाचे काम जोरात सुरू झाले आणि पुढच्या दोन वर्षांमध्ये त्याचा काही भाग हा वापरात येऊ शकतो अशी स्थिती आहे. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाबाबत दोन मतप्रवाह आहेत.  जमीन अधिग्रहण यापासून अनेक विषय प्रलंबित आहे. हा विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रशासकीय इच्छाशक्ती या सगळ्या बाबींचा विचार केला तरी किमान पाच ते सात वर्ष काम सुरू व्हायला होऊ शकतो.

केसकर यांनी म्हटले आहे कि, पुणे आणि परिसर यात Information Technology & Biotechnology (IT&BT) महत्व अधोरेखित आहे.  74 75 हजार कोटी रुपयाचं सॉफ्टवेअर पुण्यात न परदेशात निर्यात होते. गिरीश बापट खासदार असताना  धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा विषय चर्चेत आला आणि काही जागा ताब्यात घेण्यासाठी टीडीआर इंडेक्स (TDR Index) किती असावा याबाबत चर्चा झाली. जागा अधिग्रहित करण्याबाबतही land acquisition act कलम ४ व ६ कार्यवाही करता येईल अशी ही चर्चा झाली होती. सध्याची धावपट्टी ही 8316 फूट लांब आणि 45 मीटर रुंद आहे.  धावपट्टी पूर्वेला पाचशे मीटर आणि पश्चिमेला तीनशे मीटर वाढवली तर दहा हजार 940 फूट लांब आणि 45 मीटर रुंद अशी धावपट्टी झाली तर Boeing Airbus यासारखी आंतरराष्ट्रीय वाहतूक करणारी मोठी विमाने पुण्यात उतरू शकतील अथवा उड्डाण करू शकतील अशा प्रकारचा निर्णय घेणे सहज शक्य आहे.  नवीन विमानतळाच्या निर्मितीसाठी जागा अधिक ग्रहण करण्यासाठी सतरा अठरा हजार कोटी रुपये खर्च येईल तो करणे आवश्यक आहे तो करावा.  पुण्याच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी जर 160 कोटी रुपये अथवा  इंडेक्स बदलण्याचा निर्णय घेऊन काम होणार असेल तर आपण याबाबत पुढाकार घेऊन पुण्याच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करून पुणे लष्करी विमानतळावरून संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने त्यांच्या सरावाच्या वेळा सोडून जागतिक नकाशावर विमानतळ आपण पुढच्या वर्षाच्या आत करू शकू.  पुण्यातील औद्योगिक आयटीबीटी क्षेत्रातील वाढीसाठी ही एक सुलभ वाहतूक व्यवस्था करण्या साठी आपण पुढाकार घ्यावा,अशी मागणी पुणे विमानतळ सल्लागार समिती माजी सदस्य उज्ज्वल केसकर यांनी मोहोळ यांच्याकडे केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0