गॅस सिलिंडर दरवाढीचा काँग्रेस महिला आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध
पुणे | सातारा रोड सिटीप्राईड चौकात पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्र सरकारने गॅस सिलिंडर ५० रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांनी केंद्र सरकारने आज गस सिलिंडर केलेल्या ५० रुपये दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या नेतृत्वाखाली विभागीय महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, बाळासाहेब अटल, संतोष नांगरे, सागरराजे भोसले, शशिकला कुंभार पूनम पाटील, स्वाती चिटणीस,दीलशाद अत्तार, सुशांत ढमढेरे सतीश वाघमारे,दिलीप अरुंदेकर,समीर पवार, सोनाली उजागरे,वर्षाराणी कुंभार इत्यादी मान्यवर आणि महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या तसेच यावेळी आंदोलन चालू असताना रस्त्यावरुन जाणाऱ्या महिला तसेच नागरिक यांनी या आंदोलनात उस्फूर्त सहभागी होऊन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सोनाली मारणे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) म्हणाल्या, घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये ३५०.५० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आपल्याच नागरिकांवर नरेंद्र मोदी सरकार वारंवार गॅसच्या किमती वाढवून जणू ‘सर्जिकलं स्ट्राईक’च करत आहॆ. गोरगरिबांसह मध्यमवर्गीय कुटुंबाचं जगणं अक्षरशः मुश्किल होऊन बसलं आहॆ. सलग दुसऱ्या तिमाहीत विकासाचा वेग कमी होतोय, शेतकरी चुकीच्या धोरणामुळे मेटाकुटीला आले आहेत. बेरोजगारी कधी नव्हे इतकी वाढलीय, सरकारी बँका, कंपन्या आणि सार्वजनिक उपक्रम उद्योगपतींच्या दावणीला बांधले जात आहेत. विरोधात बोलणारांची केंद्रीय यंत्रणाद्वारे मुस्कटदाबी सूरू आहॆ. मोदी सरकारचे धोरण शूण्यतेमूळे आलेले आर्थिक अपयश भरून काढण्यासाठी गॅस, पेट्रोल, डिझेल आणि विजेची दरवाढ करण्यात येतं आहॆ. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस दरवाढीचा मी तीव्र शब्दांत धिक्कार करते