Protest against Kirit Somaiya | पुण्यात कॉंग्रेस आणि शिवसेना महिला आघाडी कडून किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन
Protest against Kirit Somaiya |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pune Congress) वतीने भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या प्रसार माध्यमात प्रसिध्द झालेल्या आक्षेपार्ह व्हिडिओ विरोधात टिळक रोड, ग्राहक पेठ समोर आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या अश्लील कृत्याचा निषेध शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पुणे महिला आघाडीच्या (Shivsena Women wing) वतीने करण्यात आला. (Protest against Kirit Somaiya)
यावेळी कॉंग्रेस शहाराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) म्हणाले की, ‘‘सातत्याने आपल्या विरोधकांवर बेछूट आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा खरा चेहरा आक्षेपार्ह व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांसमोर आला आहे. स्वत:ला चारित्र्यवान समजणारे किरीट सोमय्या यांचे चारित्र्यहीन दर्शन जनतेला झाले असून स्वच्छ प्रतिमेचे दाखले देणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी या प्रकरणी सोयीस्कर मौन बाळगले आहे. महिला वर्गावर सातत्याने अत्याचार व अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा या आंदोलनाद्वारे आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व सोमय्या यांच्या या गलीच्छ कृतीबद्दल त्यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई व्हावी.’’ (Pune News)
यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबुब नदाफ, सुजित यादव, रमेश सकट, रविंद माझीरे, अक्षय माने, रजनी त्रिभुवन, सुंदरा ओव्हाळ, सीमा महाडिक, छाया जाधव, प्रकाश पवार, अश्विनी गवारे, सतिश पवार, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, रवि ननावरे, समीर गांधी, हेमंत राजभोज, आसिफ शेख, संतोष पाटोळे, विकी खन्ना, विशाल जाधव, बळीराम डोळे, संजय मोरे, लतेंद्र भिंगारे, संतोष डोके, शिवराज भोकरे, राहुल वंजारी, विल्सन चंदवेल, आशितोष शिंदे, नैनाताई सोनार, वंदना पोळ, मुक्ता शिंदे, संगीता कंधारे, नंदीनी कवडे, लीला भायगुडे, शोभा भगत, अनिता भायगुडे, सुविधा त्रिभुवन आदी उपस्थित होते.
शिवसेना महिला आघाडी शहर संघटीका सविताताई मते (Savita Mate) म्हणाल्या की, त्या व्हिडिओ संदर्भात भाजपा किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी तसेच गृहमंत्री या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करणार आहेत ते स्पष्ट करावे.
नगरसेविका पल्लवीताई जावळे म्हणाल्या, भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आता का शांत बसल्या आहेत?, या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होते की किरीट हा विक्षिप्त माणूस आहे त्यावर कारवाई व्हावी .
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आंदोलनास शहर संघटीका सविता मते, माजी नगरसेविका व संघटीका पल्लवी जावळे, विद्या होडे,करूणा घाडगे, प्रज्ञा लोणकर, स्नेहल पाटोळे, गौरी चव्हाण,पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाल, भारती भोपळे, दिपाली राऊत, संगीता भिलारे, मीनाक्षी हरिशंद्रे, नमिता चव्हाण, अमृत पठारे, सुलभा तळेकर, स्वाती ठकार, शितल जाधव, अनुपमा मांगडे ,विजया मोहिते, शिल्पा पवार ,वत्सला घुले ,अनिता जांभूळकर ,स्नेहल आल्हट, वासंती शिरसाट, आशुताई शिरसाट, भारती दामजी, पल्लवी नागपुरे, वैशाली दिघे, विमल परदेसी, लता गुंजाळ, प्रियांका जव्हेरी, स्मिता पवार, दिपा भंडारी, नीलू गड्डम, बेबी म्हेत्रे इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .
News Title |Protest against Kirit Somaiya from Congress and Shiv Sena Women’s Aghadi in Pune