Maharashtra kesari : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी!

HomeBreaking Newsमहाराष्ट्र

Maharashtra kesari : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी!

Ganesh Kumar Mule Apr 09, 2022 5:05 PM

Maharashtra Kesari | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच! |  भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Hind Kesari | ‘हिंद केसरी’ची गदा यंदा महाराष्ट्राकडे! पुण्याच्या अभिजीत कटकेने मारलं मैदान
‘Maharashtra Kesari’ | ‘महाराष्ट्र केसरी’  पैलवान शिवराज राक्षे | महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी!

महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील(वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला.

या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती.

“काहीही झाले तरी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकायचीच असा पण मी केला होता. आपण ही कुस्ती जिंकणारचं असा सुरूवातीपासूनच मला विश्वास होता. त्यासाठी मी पूर्वीपासून तयारीही केली होती. सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेऊन शेवटी आक्रमक व्हायचे असे धोरण मी ठरवले होते. कुस्ती करत असताना मी जे ठरवले होते त्याप्रमाणे कुस्ती होत गेली आणि अंतिम क्षणी मी केलेली खेळी यशस्वी झाली व गुणाधिक्यावर मी जिंकलो.” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर पृथ्वीराज पाटील याने दिली.

पृथ्वीराज पाटीलचा परिचय –

पृथ्वीराज पाटील, मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा, वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

विशाल बनकरचा परिचय –

विशाल बनकर, पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करतोय. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मांडवे गावात १९८७ रोजी विशाल बनकरचा जन्म झाला. विशाल महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या आहे. गेल्या दहा वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे, सुरुवातीला भारत भोसले खवसपूर तालमीत ५ वर्ष प्रशिक्षण, मागील पाच वर्षांपासून कोल्हापुरातील श्री शाहू विजयी गंगावेस तालमीत प्रशिक्षण घेतोय. ९७ किलो वजनी गटात २०१८ व २०१९ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विशाल बनकरने सुवर्णपदक पटकावले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0